बॉलिवूड बादशहा शाहरुख खानच्या ‘रईस’ने बॉक्स ऑफिसवर चित्रपटातील नावाप्रमाणे दमदार कमाई करुन श्रीमंती दाखवून दिली आहे. या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून कौतुकाचा वर्षाव होत असताना शाहरुखच्या यशावर त्याच्या मुलांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली. शाहरुख खान याची मुलांना देखील पप्पांच्या चित्रपटाबद्दल चांगलीच उत्सुकता असल्याचे दिसून आले. शाहरुखने खुद्द यासंदर्भात माहिती दिली होती. या चित्रपटातील शाहरुखची डॉनची व्यक्तिरेखा तिन्ही मुलांना चांगलीच आवडली असल्याचे शाहरुखने सांगितले. सूत्रांकडून मिळणाऱ्या माहितीनुसार, आर्यनला शाहरुखचा चित्रपट कुल असल्याचे वाटते. तर सुहानाला चित्रपटातील दुसरा भाग अधिक आकर्षित करणारा वाटला. शाहरुखसोबत नेहमीच चित्रपटच्या चित्रीकरणात आणि प्रमोशनमध्ये दिसलेल्या चिमुकल्या अब्राहमची प्रतिक्रिया साधारण चाहत्याप्रमाणेच आहे. चित्रपटातील सनी लिओनीच्या गाण्यावर अब्राहमने धम्माल नृत्य केले तर शाहरुखच्या अॅक्शन दृष्याचाही त्याने आनंद घेतला.

‘रईस’ चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित झाला होता. चित्रपटप्रदर्शनापूर्वी शाहरुखने चित्रपटाचे विविध मार्गाने प्रमोशन करण्यास सुरुवात केली होती. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर देखील शाहरुख आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसते. याच पार्श्वभूमीवर नुकताच शाहरुख ‘रईस’च्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गुजरातच्या दौऱ्यावर गेल्याचे दिसले होते. चित्रपटाच्या कथानकात साकारलेल्या भूमीत प्रमोशन करताना महिलांची भेट घेताना शाहरुख लूंगी नेसताना दिसला होता. दरम्यान त्याने या चित्रपटातील ‘कोणताही व्यवसाय छोटा नसतो आणि व्यवसायापेक्षा मोठा कोणता धर्म नसतो’ या आशयाचा संवाद सध्या सोशल मीडियावर चांगलाच लोकप्रिय होताना दिसत असल्याचा आनंद व्यक्त केला.

बॉलीवूड बादशहा शाहरुख खान याचा ‘रईस’ चित्रपट सर्व देशभरात प्रेक्षकांची मने जिंकत आहे. प्रमोशनमध्ये कोणतीही कसर बाकी न ठेवणा-या शाहरुखने पुन्हा एकदा त्याच्या चाहत्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजवले आहे. संजय गुप्ता दिग्दर्शित आणि अभिनेता हृतिक रोशनची मुख्य भूमिका असलेला ‘काबिल’ चित्रपट स्पर्धेत असतानाही ‘रईस’ चित्रपटाने भारतात १०० कोटींच्यावर गल्ला जमविला आहे. या चित्रपटाने भारतात १०९.०१ कोटींची कमाई केली आहे. व्यापाऱ समिक्षक रमेश बाला यांनी केलेल्या ट्विटनुसार, १०० कोटींच्या क्लबमध्ये जाणारा शाहरुखचा हा सातवा चित्रपट आहे. या चित्रपटाने अजय देवगण आणि अक्षय कुमारलाही मागे टाकले आहे. या दोन्ही कलाकारांचे १०० कोटींच्या क्लबमध्ये सहा चित्रपट आहेत. मात्र शाहरुखच्या ‘रईस’ची आमिर खानच्या ‘दंगल’शी कोणतीच तुलना होणे शक्य नाही. जगभरात ‘धाकड’ कमाई करणा-या ‘दंगल’ने आतापर्यंत सर्वाधिक कमाई करणा-या चित्रपटाच्या यादीत द्वितीय स्थान पटकाविले आहे. ‘पीके’नंतर सर्वाधिक कमाई करणारा ‘दंगल’ हा भारतातील दुसरा चित्रपट ठरला आहे.