दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम परिषदेला नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर उद्योग, क्रिडा आणि अभिनय क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अभिनेता शाहरुख खान एकत्र असताना, शाहरुख म्हणाला की, ‘आतापर्यंत महाराष्ट्राने खूप दिले, आता परतफेड करायची वेळ आली आहे.’ मानवतावादी कार्य, महिला आणि लहान मुलांना समाजात समान आणि सन्मानपूर्वक वागणूक मिळावी यासाठी शाहरुखने केलेल्या प्रयत्नांचा गौरव म्हणून दावोसमध्ये त्याचा गौरव करण्यात आला. यावेळी हॉलिवूड अभिनेत्री केट ब्लँशेट आणि एल्टन जॉन यांनाही हा पुरस्कार देण्यात आला.

https://www.instagram.com/p/BdXoicMjK1y/

आपल्या खोडकर स्वभावात बोलताना किंग खान म्हणाला की, ‘मी जेव्हाही मुख्यमंत्र्यांना भेटतो, तेव्हा मी त्यांना विचारतो, मी राज्यासाठी काय करू ते सांगा. कारण मी आता ज्येष्ठ नागरिक झालो आहे. मला महाराष्ट्राने भरभरून प्रेम दिले.’ शाहरुखच्या अभिनयाबरोबरच त्याच्या चंचल आणि विनोदी स्वभावाचेही लाखो चाहते आहेत. आणि त्यात त्याला देशाविषयीचं प्रेम पाहून त्याचे चाहते खूश होणार हे नक्की.

https://www.instagram.com/p/Bd7PSN4jBWe/

दरम्यान, लवकरच शाहरुख ‘झिरो’ सिनेमात दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. यात तो बुटक्या व्यक्तीची भूमिका साकारेल. २१ डिसेंबर २०१८ला प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमात कतरिना कैफ आणि अनुष्का शर्मा यांच्याही भूमिका आहेत. सध्या शाहरुख केवळ याच सिनेमावर लक्ष केंद्रित करत असून, दुसरा कोणताही सिनेमा त्याने हाती न घेतल्याचेही शाहरुखने सांगितले.