News Flash

‘रा-वन’ची सीडी जाळून टाक म्हणणाऱ्या नेटकऱ्याला शाहरुखचे उत्तर

शाहरुखने ट्विटरद्वारे हे उत्तर दिले आहे

सोशल मीडिया हे असे प्लॅटफॉर्म आहे ज्याचा वापर एखादा संदेश हजारो लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा गप्पा मारण्यासाठी आजच्या डिजिटल वर्ल्डमध्ये केला जातो. अनेक वेळा बॉलिवूड कलाकारही त्यांच्या चाहत्यांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून गप्पा मारताना दिसतात. आता या यादीमध्ये आणखी एक नाव नोंदण्यात आले आहे. ते म्हणजे बॉलिवूडचा किंग खान शाहरुखचे.

नुकताच शाहरुखने ट्विटरद्वारे चाहत्यांशी संवाद साधत त्यांना पडलेल्या प्रश्नांनाची मजेशीर अंदाजात उत्तरे दिली आहेत. दरम्यान शाहरुखने हॅशटॅगचा वापर केला आहे. ‘आपण गप्पा मारुन बराच कालावधी उलटून गेला आहे. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही #askSRK वापरुन विचारु शकता’ असे ट्विट शाहरुखने केले होते. शाहरुखच्या या ट्विटवर चाहत्यांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. दरम्यान एका चाहत्याने शाहरुखला ‘रा-वन (Ra-One)’ ची सीडी जाळण्यास सांगितली आहे. त्यावर शाहरुखने मजेशीर उत्तर दिले आहे. ‘अरे जखमेवर आणखी किती मीठ चोळणार’ असे शाहरुख म्हणाला आहे.

एका चाहत्याने तर शाहरुखला नाश्त्यामध्ये काय आवडते असा प्रश्न देखील विचारला आहे. त्यावर शाहरुखने कॉफी असे उत्तर दिले आहे.

काही दिवसांपूर्वी शाहरुखच्या ‘फॅन’, ‘जब हॅरी मेट सेजल’ आणि ‘झिरो’ चित्रपट प्रदर्शित झाले. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर जेमतेम कमाई केली. त्यानंतर शाहरुख रुपेरी पडद्यापासून लांब असल्याचे दिसत आहे. या चित्रपटांमधील ‘झिरो’ हा शेवटा चित्रपट होता. या चित्रपटानंतर शाहरुख कोणत्याच चित्रपटामध्ये झळकला नसून त्याच्याकडे कोणताही आगामी प्रोजेक्ट नसल्याचेही पाहायला मिळत आहे. या संदर्भात त्याने नुकताच खुलासा केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2019 5:47 pm

Web Title: shahrukh khan fan says that thow ra one movie cd in the fire avb 95
Next Stories
1 इंग्रजी स्पेलिंगवरुन हरभजन वीणामध्ये टिवटिवाट
2 20 Years of Vaastav : ऐनवेळी अभिनेत्याने नाकारल्याने संजय नार्वेकरला मिळाली ‘वास्तव’मधील भूमिका
3 ..म्हणून सलमान राहतो वन बीएचके प्लॅटमध्ये
Just Now!
X