18 January 2021

News Flash

चाहत्याची सत्वपरीक्षा; महिन्याभरापासून चाहता ‘मन्नत’बाहेर उभा, कारण वाचून व्हाल थक्क

...म्हणून शाहरुखचा चाहता महिन्याभरापासून घालतोय 'मन्नत'ला घिरट्या

२०२० हे वर्ष कोणताही व्यक्ती विसरणार नाही. या वर्षात अनेक घडामोडी घडल्या. मात्र, कटू आठवणी दूर करत प्रत्येकाने २०२१ या नवीन वर्षात, नवीन संकल्प करत पदार्पण केलं आहे. विशेष म्हणजे शाहरुखच्या एका चाहत्यानेदेखील असाच एक संकल्प केला असून तो पूर्ण करण्यासाठी त्याने चक्क शाहरुखच्या बंगल्याबाहेर ठाण मांडून बसला आहे.

बंगळुरु येथील जयंत सिग्गी हे शाहरुखचे मोठे चाहते आहेत. त्यामुळे या नवीन वर्षात ते एका चित्रपटाचं दिग्दर्शन करणार असून यात शाहरुखने मुख्य भूमिका साकारावी अशी त्यांची इच्छा आहे. हीच इच्छा पूर्ण करण्यासाठी ते गेल्या कित्येक दिवसांपासून मन्नत बाहेर शाहरुखची वाट पाहत बसले आहेत. एका मुलाखतीत त्यांनी याविषयी सांगितलं आहे.

ऑगस्टमध्ये शाहरुख आणि माझी भेट झाली होती. त्यावेळी झिरोनंतर त्यांनी कोणताही चित्रपट साईन केला नाही असं त्यांनी सांगितलं होतं. हे ऐकून मी आश्चर्यचकित झालो. त्यानंतर शाहरुखसोबत आपण चित्रपट करु शकतो हा विचार माझ्या डोक्यात आला आणि मी चित्रपटाचं पोस्टर तयार करुन ते शाहरुखला ट्विट करुन पाठवलं, असं त्यांनी सांगितलं.

वाचा : सायबर क्राइमपासून रितेश देशमुख थोडक्यात बचावला, नाही तर…

जयंत सिग्गी यांच्या ट्विटला शाहरुखकडून कोणताही रिप्लाय न आल्यामुळे त्यांनी थेट मुंबई गाठली. सध्या शाहरुखने आपली स्क्रिप्ट वाचावी यासाठी ते प्रयत्न करत आहेत. त्यामुळे ते शाहरुखच्या बंगल्याबाहेर ३० डिसेंबरपासून उभे आहेत. दरम्यान, जयंत सिग्गी यांनी प्रोजेक्ट -एक्स असं त्यांच्या स्क्रिप्टचं नाव ठेवलं आहे. तसंच ३० डिसेंबरपासून ते सातत्याने ट्विटरच्या माध्यमातून त्यांचे अपडेट्स देत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2021 3:25 pm

Web Title: shahrukh khan filmmaker fan sitting outside mannat ssj 93
Next Stories
1 Video: ‘अजयला जेव्हा कळलं की मला करोना झालाय, तेव्हा…’, अभिषेकने केला खुलासा
2 सायबर क्राइमपासून रितेश देशमुख थोडक्यात बचावला, नाही तर…
3 ‘विनाकारण संकट…’, ट्रोल होताच रिया चक्रवर्तीच्या मित्राने डिलिट केली ‘ती’ पोस्ट
Just Now!
X