News Flash

घरात बसून शॉर्ट फिल्म बनवा, शाहरुख खान देणार ‘ही’ संधी

शाहरुखने चाहत्यांना आवाहन केले आहे.

करोना व्हायरसमुळे सध्या संपूर्ण देशात लॉकडाउन करण्यात आले आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये अनेकजण घरात अडकून पडले आहेत. तसेच मनोरंजनाचे साधन शोधताना दिसत आहेत. अशातच बॉलिवूडचा किंग खान शाहरुखने चाहत्यांसाठी एक टास्क आणला आहे आणि हा टास्क पूर्ण केल्यानंतर शाहरुख त्या चाहत्याला एक संधी देखील देणार आहे.

शाहरुखने त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने चाहत्यांना नेमके काय करायचे आहे हे सांगितले आहे. सध्या लॉकडाउनमुळे आपल्या सर्वांकडे बराच रिकामा वेळ आहे. म्हणून मी तुमच्यासाठी एक छोटेसे काम घेऊन आलो आहे. पण थोड्या मजेशीर आणि क्रिएटीव्ह अंदाजात आपण ते पूर्ण करुया. सध्या मिळालेल्या वेळात आपण अनेक चित्रपट आणि शो पाहत आहोत. त्यामुळे स्वतःमधल्या फिल्ममेकरला जागे करा आणि एक इनडोअर हॉरर फिल्म शूट करा असे शाहरुखने पोस्टमध्ये म्हटले आहे.

पण ही शॉर्ट फिल्म शूट करण्यासाठी शाहरुखने काही नियम देखील सांगितले आहेत. या नियमांमध्ये, तुम्ही शूट करण्याठी कोणताही कॅमेरा वापरु शकता, तसेच घरातील काही वस्तूंचा वापर करु शकता. शॉर्ट फिल्ममध्ये तुम्ही एका पेक्षा अधिक लोकांनाही घेऊ शकता. पण सोशल डिस्टंसिंगची काळजी घेण गरजेचे आहे असे म्हटले आहे.

१८ मे पर्यंत तुम्ही ही शॉर्ट फिल्म दिलेल्या ई-मेल आयडीवर पाठवू शकता. पॅट्रिक ग्राहम, विनित कुमार, आहाना कुमरा आणि गौरव वर्मा हे शॉर्ट पाठवणाऱ्या स्पर्धकांची नोंद करतील. या यादीमधून तीन स्पर्धकांची निवड करण्यात येईल. या तिन्ही विजेत्या स्पर्धकांना शाहरुख खानसोबत व्हिडीओ कॉलवर बोलण्याची संधी मिळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2020 8:12 pm

Web Title: shahrukh khan gave special task for fans avb 95
Next Stories
1 मलायका अरोराच्या आईला पाहिलेत का?
2 शेजारच्या व्यक्तीला करोना झाल्याचे कळताच अशी होती शिल्पाच्या नवऱ्याची प्रतिक्रिया
3 लॉकडाउनमुळे परदेशात अडकलेल्या अभिनेत्रीला तब्बल दोन वर्षांनंतर आईने केला फोन
Just Now!
X