News Flash

शाहरुख खानला मारलं म्हणून गुलशन ग्रोव्हर यांना ‘या’ देशाने नाकारला व्हिसा

गुलशन ग्रोव्हर यांनी सांगितला चकित करणारा अनुभव; व्हिडीओ होतोय व्हायरल...

गुलशन ग्रोव्हर हे बॉलिवूडमधील एक नामांकित अभिनेते आहेत. खऱ्या आयुष्यात अत्यंत साधे आणि शांत असणाऱ्या गुलशन ग्रोव्हर यांनी अनेक चित्रपटांमध्ये प्रामुख्याने खलनायकांच्या भूमिका साकारल्या आहेत. परिणामी त्यांना बॉलिवूडमधील ‘बॅडमॅन’ म्हणून ओळखलं जातं. परंतु या ऑनस्क्रीन इमेजमुळे त्यांना खऱ्या आयुष्यातही अनेकदा त्रास सहन करावा लागलाय. असाच एक चकित करणारा किस्सा त्यांनी ‘डान्स इंडिया डान्स’ या शोमध्ये सांगितला. चित्रपटात शाहरुख खानला मारल्यामुळे त्यांना मोरक्को देशाचा व्हिसा नाकारण्यात आला होता.

अवश्य पाहा – बिग बॉस १४ मध्ये झळकणार ग्लॅमरस पवित्रा; ७ दिवसांसाठी मिळणार लाखो रुपयांचं मानधन

अवश्य पाहा – “प्यार एक धोका हैं…” अभिनेत्रीला प्रियकराने फसवलं: दुसऱ्याच तरुणीबरोबर केलं लग्न

“माझ्या चित्रपटाचं शूटिंग पुर्ण झालं होतं. पण भारतात परतण्यासाठी आणखी एक दिवस बाकी होता. त्यामुळे मोरक्कोमधील शहरात फिरण्याचा निर्णय मी घेतला. त्यासाठी मला एक दिवसाचा व्हिसा हवा होता. मी एका महिला ऑफिसरकडे व्हिसा बाबत विचारलं. परंतु त्यांनी शाहरुख खानमुळे मला नकार दिला. त्या महिला ऑफिसर शाहरुखच्या खुप मोठ्या फॅन होत्या. मी चित्रपटामध्ये शाहरुखला मारलं हे त्यांना आवडलं नाही. त्यामुळे त्यांनी मला एक दिवसाचा व्हिसा देण्यास नकार दिला.” हा चकित करणारा किस्सा गुलशन ग्रोव्हर यांनी सांगितला. या गंमतीशीर किस्स्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 2, 2020 3:06 pm

Web Title: shahrukh khan gulshan grover morocco refused visa mppg 94
Next Stories
1 मी सावळी असल्याचा मला मनस्वी आनंद : चित्रांगदा
2 “तुम्ही मास्क वापरणारच नव्हता ना?”; करोना पॉझिटिव्ह ट्रम्प यांची अभिनेत्रीने उडवली खिल्ली
3 कमबॅकसाठी जेनेलिया तयार; ‘ही’ भूमिका करण्याची इच्छा
Just Now!
X