News Flash

Video सलमान-शाहरुखची ही भेट अविस्मरणीयच

नुकत्याच पार पडलेल्या ‘स्टार स्क्रीन अवॉर्ड्स’ कार्यक्रमामध्ये शाहरुखने सलमानची साथ अर्ध्यावरच सोडली होती.

सलमान खान, शाहरुख खान (संग्रहित छायाचित्र)

नव्वदीच्या दशकापासून ते आतापर्यंत दबंग सलमान खान आणि शाहरुख खान यांनी बॉलिवू़डमध्ये आपला वेगळा ठसा उमटविला आहे. सुरुवातीच्या काळात या दोन्ही कलाकारांनी एकमेकांसमोर काम केले आहे. ‘करण-अर्जून’ या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले होते. त्यानंतर शाहरुख खानची आणि काजोलची मुख्य भूमिका असलेल्या ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटात सलमान खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसला होता. तर सलमानची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘हर दिल जो प्यार करेगा’ या चित्रपटात शाहरुखने पाहुण्याची भूमिका साकारली होती. हम तुम्हारे हैं सनम’ या चित्रपटात सलमानने शाहरुखसोबत सह कलाकाराची भूमिका साकारली होती. त्यानंतर या दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता. २००८ मध्ये कतरिना कैफच्या वाढदिवसाच्या पार्टीतील दोघांतील वाद सर्वज्ञातआहे.

या वादानंतर आज पर्यंत हे दोन्ही कलाकार चित्रपटाच्या निम्मिताने एकत्र आलेले नाहीत. काही दिवसांपूर्वी सलमान खानची मानलेली बहिण अर्पिताच्या लग्नसमारंभात शाहरुख सलमान एकत्र आले होते. त्यानंतर त्यांच्यातील वाद कमी झाल्याचे दिसून येत आहे. नकत्याच पार पडलेल्या ‘स्टार स्क्रीन अवॉर्ड्स’च्या व्यासपीठावर सलमान-शाहरुख एकत्र दिसले होते. यावेळी त्यांनी त्यांनी एकत्रित काम करण्यास तयारी दर्शविली. आम्हाला बुद्धिमान लेखक आणि संयमी निर्मात्यासोबत एकत्र काम करायच आहे. असे त्यांनी म्हटले होते.

शाहरुख आणि सलमान यांच्यातील वादानंतर बऱ्याच दिवसांनी ‘स्टार स्क्रीन अवॉर्ड्स’च्या व्यासपीठावर एकत्र आलेल्या या जोडीचा नव्वदीच्या दशकातील एकत्र दर्शन हे यावेळीपेक्षाही धम्माल होते. १९९८ मध्ये शाहरुखच्या ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटातील अभिनयासाठी पुरस्कार मिळाला होता. यावेळी शाहरुखने आपल्याला मिळालेला पुरस्कार सलमानला दिला होता. विशेष म्हणजे या पुरस्काराची घोषणाही ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटात मुख्य भूमिका करणाऱ्या काजोलने केली होती. तिच्यासोबत व्यासपीठावर महिमा चौधरी देखील होती. शाहरुखने पुरस्कार स्वीकारल्यानंतर सलमानला व्यासपीठावर बोलवत आपल्याला मिळालेला पुरस्कार सलमानला दिला होता. कुछ कुछ होता है या चित्रपटामध्ये काजोल आणि शाहरुखसोबत सलमान खान सहकलाकाराच्या भूमिकेत दिसला होता. शाहरुख आणि सलमानची अशी भेट पुन्हा पाहणे दोघांच्याही चाहत्यांना नक्कीच आवडेल. दरम्यान नुकत्याच झालेल्या कार्यक्रमामध्ये शाहरुख अर्ध्यातूनच निघून गेला होता. त्याला पुरस्कार प्राप्त न झाल्याने त्याने कार्यक्रमातून बाहेर जाणे पसंत केले, अशी चर्चा देखील बॉलिवूडमध्ये रंगली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2016 8:52 pm

Web Title: shahrukh khan hands his award to salman khan watch video
Next Stories
1 ‘डॅडी’ सिनेमामुळे अर्जुन आला अडचणीत
2 ‘ती सध्या काय करते’चा दुसरा टिझर प्रदर्शित
3 अमिताभ बच्चन यांचे लाइव्ह फेसबुक चॅट, चाहत्यांच्या प्रश्नांना दिली उत्तरे
Just Now!
X