21 January 2021

News Flash

आजारपणाला कंटाळलेल्या इरफानला शाहरुख करतोय अशी मदत

सध्या शाहरुखच्या या मदतीला कोणाचीच तोड नसल्याचे सांगण्यात येत आहे.

अभिनेता इरफान खानाने न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर neuroendocrine tumour या दुर्धर आजारापुढे हात टेकले असून तो सध्या लंडनमध्ये या आजारावर उपचार घेत आहे. आजारपणाला कंटाळलेल्या इरफानला बी टाऊनमधील अनेक कलाकारांनी मदतीचा हात पुढे केला असून शाहरुख खानने केलेल्या मदतीची मात्र सर्वत्र चर्चा होत आहे. सध्या शाहरुखच्या या मदतीला कोणाचीच तोड नसल्याचे सांगण्यात येत आहे.

इरफानला न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर हा दुर्धर आजार झाला असून गेल्या तीन महिन्यांपासून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. या आजाराला इरफान प्रचंड कंटाळला असून त्याने या आजारासमोर शरणागती पत्करली आहे. त्यामुळे इरफानला भावनिक आणि आर्थिक आधार देण्यासाठी अनेक सेलिब्रेटीज समोर आले असून ते त्यांच्यापरीने इरफानला मदत करत आहेत. या सेलिब्रेटीजमध्ये शाहरुख खाननेदेखील मदत केली असून सध्या शाहरुखच्या या मदतीची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

‘स्पॉटबॉय’संकेतस्थळानुसार, शाहरुख आणि इरफान यांच्यातील मैत्री तर सर्वांनाच ठाऊक आहे. त्यामुळे उपचारासाठी लंडनला रवाना होण्यापूर्वी इरफानला शाहरुखची भेट घ्यायची होती. याकारणामुळे इरफानच्या पत्नीने सुतापाने शाहरुखला फोन करुन मुंबईतील आयलॅंड येथे त्यांच्या घरी येण्याची विनंती केली होती. या विनंतीचा मान राखत शाहरुखही इरफानला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेला. या भेटीमध्ये शाहरुख आणि इरफानने दोन तास चर्चा केल्यानंतर शाहरुखने इरफानला भावनिक आधार देण्याबरोबरच त्याच्या लंडनमधील घराच्या चाव्याही इरफानच्या स्वाधीन केल्या.

उपचार घेताना इरफानला कोणत्याही हॉटेलमध्ये राहण्याची गरज भासू नये यासाठी शाहरुखने त्याच्या घराच्या चाव्या इरफानला देऊ केल्या. उपचार सुरु असताना प्रत्येक रुग्णाला घरच्या मायेची गरज असते. त्यामुळे जर आपलंच घर असेल तर रुग्णाची रिकव्हरी व्हायला मदत होते. त्यामुळे शाहरुखने इरफानला घराच्या चाव्या दिल्या. या चाव्या घेण्यासाठी इरफाने प्रथम नकार दिला होता. मात्र, शाहरुख पुढे त्याचा निभाव लागला नाही आणि त्याला चाव्या स्वीकाराव्या लागल्या.

दरम्यान, शाहरुखने केलेल्या या मदतीची सध्या सर्वत्र चर्चा होत असून इरफानच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत असल्याचे त्याच्या एका मित्राने सांगितले असून तो या वर्षाअखेरपर्यंत भारतात परतण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2018 12:53 pm

Web Title: shahrukh khan is helping irrfan khan who is diagnosing neuroendocrine cancer
Next Stories
1 Social Viral : वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी मुंबई पोलिसांची ‘धडक’ मोहिम
2 ..आणि ‘फन्ने खान’ मधील गाण्यात झाला असा बदल!
3 ..म्हणून करण जोहरवर मंगेशकर कुटुंबीय झाले नाराज!
Just Now!
X