News Flash

…म्हणून शाहरुखने नाकारला राकेश शर्मांचा बायोपिक

आमिर खानने या चित्रपटासाठी शाहरुख खानचं नाव दिग्दर्शकांना सुचविलं होतं.

गेल्या काही दिवसापासून कलाविश्वामध्ये अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या बायोपिकची चर्चा सुरु आहे. या चित्रपटामध्ये राकेश शर्मा यांच्या भूमिकेसाठी बॉलिवूडमधील अनेक लोकप्रिय कलाकारांच्या नावाची चर्चा होती. यामध्ये आमिर खानच्या नावाचीही चर्चा झाली होती. मात्र आमिरने या चित्रपटासाठी शाहरुख खानचं नाव चित्रपट दिग्दर्शकांना सुचविलं होतं. त्यामुळे आमिरऐवजी बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचं नाव जवळजवळ निश्चित झालं होतं. त्यामुळे राकेश शर्मा यांच्या भूमिकेमध्ये शाहरुख झळकणार असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र आता शाहरुखने अचानकपणे या चित्रपटासाठी नकार दिल्याचं समोर आलं आहे.

राकेश शर्मा यांच्या भूमिकेला शाहरुख खान न्याय देऊ शकतो असा विश्वास दाखवून मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने या चित्रपटासाठी शाहरुखचं नाव सुचवलं होतं. मात्र आता शाहरुखने चित्रपटात काम करण्यास नकार दिला आहे. शाहरुखच्या या निर्णयामुळे कलाविश्वामध्ये जोरदार चर्चा सुरु झाली असून शाहरुखने त्याच्या आगामी चित्रपटासाठी हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे.

 

View this post on Instagram

 

Hug from the Thug….!! Beat that!

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk) on

चित्रपट दिग्दर्शक फरहान अख्तरचा आगामी ‘डॉन ३’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख खान मुख्य भूमिकेमध्ये झळकणार आहे. त्यामुळेच शाहरुखने राकेश शर्माच्या बायोपिकसाठी नकार दिल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, राकेश शर्मा यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाची निर्मिती ‘आरकेएफ प्रोडक्शन’ करणार आहे. हा चित्रपट २०१९मध्ये प्रदर्शित होणार असून या चित्रपटातील मुख्य अभिनेत्रीसाठी प्रियांका चोप्रा, भूमी पेडणेकर आणि फातिमा सना शेख या तिघींच्या नावाचीही चर्चा सुरु आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2019 11:21 am

Web Title: shahrukh khan not the part of rakesh sharma biopic film farhan akhtar don 3
Next Stories
1 #MeToo : प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानींवर लैंगिक शोषणाचे आरोप
2 Video : ‘मी पण सचिन’साठी स्वप्नील करतोय अशी मेहनत
3 Video : आईसारखाच तैमूरचा आणखी एक कूल लूक समोर
Just Now!
X