News Flash

मित्रांसोबत डिनरला गेल्यावर बिल कोण देतं? चाहत्याच्या प्रश्नाला शाहरूखचं उत्तर

नुकताच शाहरुखने चाहत्यांसोबत ट्विटरद्वारे गप्पा मारल्या आहेत.

बॉलिवूड कलाकार हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. ते बऱ्याच वेळा सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांशी संवाद साधताना दिसतात. मंगळवारी बॉलिवूडचा किंग खान शाहरुखने देखील चाहत्यांशी गप्पा मारल्या आहेत. दरम्यान त्याने चाहत्यांच्या अनेक प्रश्नांना देखील उत्तरे दिली आहेत.

शाहरुखने ट्विटरवर #AskSRK च्या माध्यमातून चाहत्यांशी गप्पा मारल्या. एका यूजरने शाहरुखला मजेशीर अंदाजात प्रश्न विचारला होता. ‘जेव्हा तू फिल्म इंडस्ट्री बाहेरील तुझ्या मित्रांसोबत जेवायला हॉटेलमध्ये जातोस तेव्हा बिल तू भरतोस की तुझे मित्र भरतात’ असे एका यूजरने विचारले होते.

आणखी वाचा- …तेव्हा समजलं बिग बी अन् माझ्यातलं अंतर; शाहरुखने सांगितला ‘मोहब्बतें’च्या सेटवरचा अनुभव

त्यावर शाहरुखने मजेशीर उत्तर दिले आहे. ‘मी किती लोकप्रिय आहे या गोष्टीचा इथे काही संबंध नाही. माझे मित्रच बिल भरतात. कारण मी पैसे घेऊन फिरत नाही’ असे शाहरुख म्हणाला आहे. शाहरुखने दिलेल्या उत्तराची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2020 4:08 pm

Web Title: shahrukh khan pass time chat who pays the bill for dinner viral avb 95
Next Stories
1 महाराष्ट्राच्या भावना दुखावल्याप्रकरणी ‘कलर्स’चा माफीनामा; मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
2 पुन्हा एकदा हॉलिवूडपटात झळकणार ‘देसी गर्ल’; जाणून घ्या, तिच्या प्रोजेक्टविषयी
3 प्रसिद्ध अभिनेत्री अपराजिता यांना करोनाची लागण
Just Now!
X