News Flash

‘रईस’च्या प्रमोशनसाठी शाहरुख गाण्याच्या मंचावरही जाणार

शाहरुख स्टार प्लसवरील कार्यक्रमातून करणार रईस चित्रपटाची प्रसिद्धी

अभिनेता शाहरुख खान (संग्रहित छायाचित्र)

बॉलिवूड बादशहा शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यग्र आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला धमाकेदार सुरुवात करण्यासाठी शाहरुख खानने कोणत्याही कार्यक्रमाच्या व्यासपीठावर जाण्याची जणू तयारीच केली असल्याचे दिसतय. याचाच एक भाग म्हणून सलमान खान सूत्रसंचालन करत असलेल्या बिग बॉसच्या घरातून सलमान खानच्या साक्षीने ‘रईस’ प्रसिद्धी पक्की झाल्यानंतर आता शाहरुख आणखी एका व्यासपीठावरुन चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसणार आहे. शाहरुख ‘रईस’ चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी ‘दिल है हिंदुस्तानी’ या गाण्याच्या शोमध्येही सहभागी होणार असल्याची माहितीविश्वसनिय सूत्रांकडून मिळाली आहे.

‘दिल है हिंदुस्तानी’ या कार्यक्रमामध्ये रशिया, ब्रुनेई, न्यूयॉर्क, राजस्थान, पंजाब आणि जगभरातील अन्य गायकांना व्यासपीठ निर्माण करुन दिले आहे. स्टार प्लसवरुन या कार्यक्रमाचे प्रसारण केले जाते. या कार्यक्रमामध्ये समिक्षक म्हणून गायक आणि संगीतकार शेखर रवजियानी, चित्रपट निर्माते करण जोहर, गायक शलमली खोलगडे यांच्यासह बादशहा शाहरुख खान सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. शाहरुख या कार्यक्रमातून त्याच्या आगामी चित्रपटाची प्रसिद्धी करणार असून बुधवारी या भागाचे चित्रिकरण करण्यात येणार आहे. या भागाचे प्रसारण जानेवारीमध्ये ‘रईस’ चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यानच होणार आहे. दरम्यान ‘द कपिल शर्मा शो’ च्या माध्यमातूनही शाहरुख चित्रपटाचे प्रसिद्धी करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. पण अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती कपिल शर्मा किंवा या कार्यक्रमाच्या आयोजकांनी दिलेली नाही.

शाहरुख खानचा आगामी ‘रईस’ हा चित्रपट सध्या अनेक कारणांनी चर्चेचा विषय बनला आहे. अंडरवर्ल्ड डॉनच्या आयुष्यावर आधारित असणारा हा चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. शाहरुखच्या ‘रईस’ला टक्कर देण्यासाठी २५ जानेवारीला आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तो चित्रपट म्हणजे हृतिक रोशनचा ‘काबिल’. अंधत्व काय असते याची कल्पना अनेकजण करुही शकत नाहीत. पण, अंध व्यक्तिंच्या भावनांचा विचार करता त्यांच्याबद्दल नेहमीच अनेकांना सहानुभूती असते. याच अंधत्वाचा अनुभव घेत अभिनेता हृतिक रोशनने त्याच्या ‘काबिल’ या चित्रपटामध्ये एक अंध व्यक्तिरेखा साकारली आहे. ‘काबिल’ या चित्रपटाचे निर्माते राकेश रोशन यांनी चित्रपटाचे मोठ्या प्रमाणात प्रमोशन करणार नसल्याचे सांगतिले होते. त्याप्रमाणेच सध्या या चित्रपटाची वाटचार सुरु आहे. पण शाहरुखने आत्तापासूनच जोरदार प्रसिद्धी करत प्रेक्षकांना ‘रईस’कडे वळविण्यामध्ये कसून मेहनत घेताना दिसते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2017 10:05 pm

Web Title: shahrukh khan promoting raees dil hai hindustani singing reality show
Next Stories
1 आनंद राय यांच्या आगामी चित्रपटातून कंगनाचा पत्ता कट?
2 ‘द गाझी अटॅक’चे पोस्टर प्रदर्शित
3 ‘दंगल’च्या सान्याचा हा एसआरके अवतार पाहिला का?
Just Now!
X