News Flash

फराह खान आणणार ‘सत्ते पे सत्ता’चा रिमेक, शाहरुख साकारणार भूमिका?

शाहरुखला या चित्रपटात काम करण्याची इच्छा असून त्यासाठी तो फराह खानशी बोलणार आहे.

शाहरूख खान

‘झिरो’ या चित्रपटानंतर शाहरूख खानने कोणत्याही चित्रपटात भूमिका साकारली नाहीये.  या चित्रपटाने अपेक्षेपेक्षा कमी कमाई केली होती. प्रेक्षकांनी या चित्रपटाला योग्य प्रतिसाद दिला नव्हता. त्यानंतर बॉलिवूडच्या किंग खानने कोणताही चित्रपट स्वीकारला नाहीये. सोशल मीडियावर शाहरूखच्या आगामी चित्रपटांबाबत खूप चर्चा सुरु आहेत. पण नक्की कोणती बातमी खरी हे समजणे कठीण आहे.

सध्या बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांचे रिमेक येत आहेत. आता १९८२ मधील ‘सत्ते पे सत्ता’ या चित्रपटाचा रिमेक करण्यात येणार आहे. या चित्रपटाची निर्माती बॉलिवूडमधील प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका व दिग्दर्शिका फराह खान आहे. अमिताभ बच्चन व हेमा मालिनीच्या सुपरहिट ‘सत्ते पे सत्ता’ या चित्रपटाच्या रिमेकमध्ये शाहरुख काम करणार अशा चर्चा होत्या. पण, सिनेसृष्टीतील काही हालचालींवरून असे लक्षात आले आहे की, शाहरुखला या चित्रपटात काम करण्याची इच्छा असून त्यासाठी तो फराह खानशी बोलणार आहे. ‘में हूं ना’, ‘हैप्पी न्यू इयर’ यासारखे यशस्वी चित्रपट या जोडीने दिले आहेत.

या चित्रपटासाठी फराहने कतरिनाला सुद्धा विचारले आहे. पण सध्या कतरिना ‘भारत’च्या प्रमोशनमध्ये खूप व्यस्त आहे. ‘भारत’ ५ जूनला प्रदर्शित झाल्यानंतर कतरिना फराहसोबत संवाद साधणार आहे. ‘भारत’ शिवाय कतरिना रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सूर्यवंशी’ मध्ये दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2019 6:00 pm

Web Title: shahrukh khan remake satte pe satta farah khan
Next Stories
1 Video : नैना-बनी पुन्हा एकत्र; वॅनिटी व्हॅनमध्ये केला डान्स
2 किर्ती कुल्हारी व ‘तुंबाड’ फेम सोहम शाह करणार एकत्र काम
3 भारत VS टीम इंडिया, प्रेक्षक कोणाला निवडणार?
Just Now!
X