25 November 2020

News Flash

पठाणच्या सेटवरील शाहरुखचा लूक व्हायरल; पहिल्यांदाच दिसला नवा अंदाज

पाहा, 'पठाण'च्या सेटवरचा शाहरुखचा व्हायरल झालेला लूक

२०१८ साली प्रदर्शित झालेला ‘झिरो’ हा चित्रपट साऱ्यांच्याच लक्षात असेल. या चित्रपटात अभिनेता शाहरुख खानने मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटानंतर शाहरुख फारसा कोणत्या चित्रपटात झळकला नाही. मात्र, आता शाहरुख लवकरच पठाण या आगामी चित्रपटात झळकणार आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच शाहरुखचा लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सध्या सोशल मीडियावर शाहरुखचा पठाण चित्रपटातील लूक व्हायरल होत आहे. या लूकमध्ये शाहरुख एका नव्या अंदाजात दिसून येत आहे. वाढलेले केस, गॉगल आणि कोट यामुळे सध्या नेटकऱ्यांमध्ये शाहरुखची चर्चा रंगली आहे. शाहरुखचा हा फोटो यश राज स्टुडिओबाहेरील असल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान,’वॉर’ चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. तर शाहरुखसोबत दीपिका पदुकोण व जॉन अब्राहिम स्क्रीन शेअर करणार आहेत. विशेष म्हणजे यश राज फिल्मला लवकरच ५० वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यामुळे हा आनंद साजरा करणासाठी यश राज फिल्म्स ‘पठाण’ हा चित्रपट प्रदर्शित करणार असल्याचे म्हटले जात आहे. हा चित्रपट २०२१ मध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2020 4:39 pm

Web Title: shahrukh khan starts shooting for upcoming film pathan dcp 98
Next Stories
1 ‘८ दोन ७५..’; दमदार कथानक असलेला चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
2 अक्षय कुमारने ठोकला ५०० कोटींचा मानहानीचा दावा
3 ‘मॅगी’मध्ये मिळाली दोन मसाल्याची पाकिटं; ‘केबीसी’ जिंकलेल्या मोहिता यांचं ट्विट पाहून नेटकरी चक्रावले
Just Now!
X