News Flash

मुलीच्या बॉयफ्रेंडसाठी गिफ्ट घ्यायला मीच मदत करतो – शाहरुख खान

सुहाना यावेळी तिच्या वडिलांमुळे म्हणजेच शाहरुखमुळे चर्चेत आहे.

सेलिब्रिटींप्रमाणेच त्यांची मुलेसुद्धा चाहत्यांसाठी आणि प्रसारमाध्यमांसाठी आकर्षणाचा विषय ठरतात. त्यातीलच एक सेलिब्रिटी किड म्हणजे सुहाना खान. शाहरुख खानची ही मुलगी कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असल्याचे पाहायला मिळते. तिचा फॅशन सेन्स, कपडे, राहणीमान, मित्र-मैत्रिणी यांच्याविषयी जाणून घेण्याची तिच्या चाहत्यांना कायमच उत्सुकता असते. सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांना सतत उत्सुक ठेवणारी सुहाना यावेळी तिच्या वडिलांमुळे म्हणजेच शाहरुखमुळे चर्चेत आहे.

शाहरुखने अलिकडेच डेव्हिड लेटरमन यांच्या ‘माय नेक्स्ट गेस’ या कार्यक्रमात हजेरी लावली. या मुलाखतीच्या कार्यक्रमात त्याला सुहानाच्या प्रियकराविषयी प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर त्याने आश्चर्यचकित करणारे उत्तर दिले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suhana khan (@suhana_khan_officiall) on

काय म्हणाला शाहरुख?

“माझ्या मुलांबरोबर माझे मैत्रीचे संबंध आहेत. त्यांच्या समस्या सोडवायला मला आवडते. पण मुलीबरोबर तिच्या प्रियकराबाबत चर्चा करणे मला फारसे आवडत नाही. कारण सुहान फार लहान आहे. हे वय तिचे शिकण्याचे आहे. त्यामुळे इतक्या लहान वयात तिच्या आयुष्यात एखादा प्रियकर यावा असे मला वाटत नाही. त्या मुलाला सुहानाने सोडून द्यावे अशी माझी इच्छा आहे. परंतु लाडक्या मुलीच्या हट्टापुढे माझे काही चालत नाही. उलट प्रियकरासाठी भेटवस्तू खरेदी करताना मला तिची मदत करावी लागते.” अशा शब्दात शाहरुखने सुहानाच्या प्रियकराबाबत आपले मत व्यक्त केले.

 

View this post on Instagram

 

@vogueindia @suhana.khan.officiall

A post shared by Suhana khan (@suhana_khan_officiall) on

सुहाना खान सध्या अमेरिकेत अभिनयाचे प्रशिक्षण घेत आहे. अलिकडेच तिच्या पहिल्या लघुपटाचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला होता. या लघुपटाचे नाव ‘द ग्रे पार्ट ऑफ ब्लू’ असे होते. या टीझरमध्ये सुहाना आपल्या मित्राबरोबर गाडीतून प्रवास करताना दिसत होती. या टीझरला सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्धी मिळली. एका दिवसात तब्बल २६ हजार नेटकऱ्यांनी या टीझरवर आपल्या प्रतिक्रीया देत शाहरुखच्या लेकीला तिच्या फिल्मी करिअरसाठी शुभेच्छा दिल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2019 1:48 pm

Web Title: shahrukh khan suhana khans boyfriend mppg 94
Next Stories
1 शाहरूख का झाला कट्टरतावाद्यांकडून ट्रोल ?
2 सलमानने सहा दिवस आधी ठरलेलं लग्न मोडलं, साजिद नाडियाडवालाने केला खुलासा
3 राज कुंद्रा अडचणीत, इक्बाल मिर्ची कनेक्शन प्रकरणी ईडीकडून समन्स
Just Now!
X