News Flash

शाहरूख खानचा अनसीन फोटो होतोय व्हायरल; काही वर्षांपूर्वी असा दिसत होता ‘किंग खान’

यूजरने आयकॉनिक फोटो शेअर केल्यानंतर काही वेळाने संजय रॉय यांनी सुद्धा हा फोटो शेअर करत फोटोतल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

(Photo: Twitter@Iampranshup)

अभिनेता शाहरुख खानचा बॉलिवूडमधला ‘किंग खान’, ‘बाजीगर’, ‘किंग ऑफ रोमान्स’ पर्यंतचा प्रवास काही सोपा नव्हता. बॉलिवूडच्या या ‘किंग खान’ने एकेकाळी थिएटरबाहेर तिकीटंही विकली होती. त्यातून मिळालेले ५० रुपये त्याची पहिली कमाई होती. नुकतंच अभिनेता शाहरूख खानच्या तरूणपणातला एक थ्रोबॅक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. ज्यावेळी तो नाटकांमध्ये काम करत होता, त्यावेळचा हा त्याचा आयकॉनिक फोटो आहे.

गेल्या शनिवारी एका ट्विटर यूजरने अभिनेता शाहरूख खानचा हा अनसीन फोटो शेअर केलाय. या ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट फोटोमध्ये सडपातळ बांधा असलेला शाहरूख खान आणि संजय रॉय हे एका रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर इतर सहकाऱ्यांसोबत बसलेला दिसून येत आहेत. संजय रॉय हे आता एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. सोशल मीडियावर एका यूजरने हा फोटो शेअर केल्यानंतर काही वेळाने संजय रॉय यांनी सुद्धा हा फोटो शेअर करत फोटोतल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

या अनसीन फोटोबद्दल बोलताना संजय रॉय म्हणाले, “हा फोटो त्यावेळचा आहे, ज्यावेळी आम्ही दिग्दर्शक बॅरी जॉन यांच्या रफ क्रॉस‍िंग नाटकात काम करण्यासाठी कोलकातासाठी रवाना झालो होतो. कित्येक वर्षापूर्वीचा शाहरूख खानचा हा अनसीन फोटो खूप कमी जणांनी पाहिला असेल. शाहरूख खानसाठी हा फोटो खास आहेच, पण त्याच्या फॅन्ससाठी सुद्धा एखाद्या गीफ्टपेक्षा ही काही कमी नाही.

शाहरूख खानहा पहिला शो

शाहरूख खानने सुरवातीला किती तरी वर्षे नाटकांमध्ये काम केल्यानंतर तो टीव्ही क्षेत्राकडे वळला. त्याने १९८९ साली ‘फौजी’ या मालिकेतून टीव्ही क्षेत्रात डेब्यू केलं होतं. त्यानंतर पुढे आणखी काही मालिकांमध्ये झळकल्यानंतर ‘दिवाना’ चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं. २०१८ साली रिलीज झालेल्या ‘झीरो’ चित्रपटात तो झळकला होता. त्यानंतर मधल्या काळात मोठ्या ब्रेकनंतर तो ‘पठान’ चित्रपटातून पुन्हा दमदार एन्ट्री करणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2021 3:53 pm

Web Title: shahrukh khan theater time photos went viral on social media prp 93
Next Stories
1 ‘जिंदगी गुलजार है’ नंतर पाकिस्तानी लेखिका उमीरा अहमद यांची नवी लव्ह स्टोरी प्रेक्षकांच्या भेटीला
2 Viral: चेल्लम सरांनंतर आता ‘द फॅमिली मॅन २’ मधील ‘संबित’चे मीम्स व्हायरल, चहाच्या सीन्सची चर्चा
3 बर्थ डे गर्ल दिशा पटानीच्या पहिल्या ऑडिशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
Just Now!
X