22 March 2019

News Flash

Kasautii Zindagii Kay remake : एकताच्या मालिकेत बॉलिवूड ‘बादशहा’चीही वर्णी

मालिका प्रेक्षकांच्या पसंतीत उतरावी यासाठी एकता कायमच प्रयत्नशील असते.

शाहरुख खान

भारतीय प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावणारी एकता कपूरची छोट्या पडद्यावरील ‘कसौटी जिंदगी की’ ही सगळ्यात प्रसिद्ध मालिका पडद्यावर परत येत आहे. या मालिकेतील पात्रांची भूमिका वठविण्यासाठी कलाकरांची नावं निश्चित झाली असून या मालिकेच्या माध्यमातून नवे चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे या मालिकेमध्ये बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानदेखील काम करणार असल्याचं ‘पिंकव्हिला’ने म्हटलं आहे.

‘कसौटी जिंदगी की’ चा दुसरा पार्ट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मालिका प्रेक्षकांच्या पसंतीत उतराव्यात यासाठी एकता कायमच प्रयत्नशील असते. त्यामुळे यावेळीदेखील तिने कंबर कसली असून या मालिकेच्या माध्यमातून तिने चक्क शाहरुखलाच प्रेक्षकांच्या भेटीला आणायचं ठरवलं आहे.

या मालिकेच्या पहिल्या तीन भागामध्ये शाहरुख खान सूत्रधाराची जबाबदारी पार पाडणार आहे. या मालिकेमध्ये एरिका फर्नांडिस प्रेरणाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर पार्थ समाथान हा अनुरागची भूमिका करणार आहे. या नव्या पात्रांची ओळख करुन देण्याची जबाबदारी शाहरुखने उचललेली असून तो या पात्रांची ओळख करुन देणार आहे. त्यामुळे शाहरुख या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दरम्यान, शाहरुख आणि स्टार इंडिया यांच्यात झालेल्या करारामुळे शाहरुख या मालिकेचा एक भाग झाला आहे. हा कार्यक्रम १० सप्टेंबरपासून रात्री आठ वाजता स्टार प्लस या वाहिनीवर प्रसारित होणार आहे.

 

First Published on August 11, 2018 11:33 am

Web Title: shahrukh khan to play as narrator in first three episode of kasauti zindagi kayy