News Flash

गौरी खानने शेअर केला वर्कप्लेसचा व्हिडीओ

पाहा व्हिडीओ...

गौरी खानने शेअर केला वर्कप्लेसचा व्हिडीओ

निळ्याशार समुद्रामसोर आपले घर असावे असे अनेकांचे स्वप्न असते. असाच काहीसा व्ह्यू बॉलिवूडचा किंग खान शाहरुखच्या ‘मन्नत’ या बंगल्यामधून दिसतो. नुकताच गौरी खानने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर घरातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये गौरीने ‘मन्नत’च्या आतुन दिसणारा समुद्र दाखवला आहे.

एक इंटीरियर डिझायनर म्हणून लोकप्रिय असलेल्या गौरी खानचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये गौरीने तिची वर्कप्लेस दाखवली आहे. या रुममध्ये गौरीने काढलेले पेंटींग दिसत आहेत.

गौरी खान काम करत असलेल्या रुममधून निळाशार समुद्र दिसतो आहे. त्या समुद्राकडे पाहून गौरी काम करत असल्याचे म्हटले जात आहे. रुममध्ये तिने एका टेबलावर रंग ठेवलेले दिसत आहेत. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

हा व्हिडीओ शेअर करत गौरीने ‘क्वारंटाइनमध्ये मिळालेला वेळ मी माझा आगामी प्रोजेक्ट डिझाइन करण्यात घालवत आहे. हे आहे माझे काम’ असे कॅप्शन दिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2020 7:00 pm

Web Title: shahrukh khan wife gauri khan workspace at mannat watch video avb 95
Next Stories
1 सलमानने कतरिनाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; फोटो होतोय व्हायरल…
2 अमिताभ बच्चन यांचं विठोबा-रखुमाईला साकडं; म्हणाले
3 सारा अली खानने शेअर केला सैफ अली खानसोबतचा फोटो, म्हणाली…
Just Now!
X