31 May 2020

News Flash

शाहरूख खान ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये येणार!

शाहरूख 'फॅन'च्या प्रमोशनसाठी 'चला हवा येऊ द्या' च्या मंचावर येणार आहे.

सध्या किंग खान त्याच्या ‘द रिंग’ या चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त आहे.

झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमात बॉलीवूड किंग शाहरूख खान उपस्थिती लावणार आहे. शाहरूख त्याच्या आगामी ‘फॅन’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ‘चला हवा येऊ द्या’ च्या मंचावर येणार आहे. शाहरूखच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर सध्या या कार्यक्रमाच्या सेटवर जोरदार तयारी सुरू आहे.  ‘चला हवा येऊ द्या’च्या घरात आत्तापर्यंत मराठी चित्रपट आणि नाटक क्षेत्रातील दिग्गज मंडळी येऊन गेली आहेत. काही दिवसांपूर्वी ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये सोनम कपूर आणि जॉन अब्राहम यांसारख्या बॉलीवूड ताऱ्यांनी लावलेली उपस्थिती लावली होती. दरम्यान,  शाहरूख खान आल्यानंतर भाऊ कदम, कुशल ब्रदिके, भारत गणेशपुरे आणि सागर कारंडे ही मंडळी कशाप्रकारे धम्माल उडवून देतील, याची उत्सुकता आत्तापासूनच प्रेक्षकांना लागली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2016 9:34 am

Web Title: shahrukh khan will appear in chala hawa yeu dya on zee marathi
Next Stories
1 पंखे काढा, आत्महत्या टाळा – राखी सावंत
2 कॅन्सरशी यशस्वी झुंज देणाऱ्या अयानने मानले बॉलीवूडकरांचे आभार
3 भाच्याच्या संगोपनाची सलमानला काळजी, मदतनीसांच्या घेतल्या मुलाखती
Just Now!
X