News Flash

शाहरुख खानच्या डॅशिंग लुकची सोशल मीडियावर चर्चा; वयाच्या ५५ व्या वर्षी केलं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेंशन

शाहरुख खानच्या एका फोटोशूटने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. शर्टलेस फोटोशूट पाहून फॅन्स हैराण झालेत.

shah-rukh-khan-body-transformation

बॉलिवूडचा ‘किंग खान’ नावाने ओळखला जाणारा सुप्रसिद्ध अभिनेता शाहरूख खान आपल्या अनोख्या अंदाजात नेहमीच फॅन्सचं मन जिंकण्याचा प्रयत्न करत असतो. टीव्ही शो ‘फौजी’मधून आपल्या करिअरला सुरूवात करणारा शाहरूख खान आज इंडस्ट्रीमधला सुपरस्टार बनलाय. शाहरुख खानच्या एका फोटोशूटने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. हे शर्टलेस फोटोशूट पाहून अनेक फॅन्स तर हैराण झालेत. या लुकमध्ये शाहरूख खान खूपच फिट दिसून येतोय. शाहरुख खान गेल्या काही दिवसांपासून आगामी चित्रपट ‘पठान’च्या शूटिंगसाठी बरीच मेहनत घेतोय.

सुप्रसिद्ध सेलिब्रिटी फोटोग्राफर डब्बू रतनानी यांनी नुकतंच शाहरुख खानचं हे फोटोशूट केलंय. शाहरूख खानचे फोटोज सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर एकच चर्चा सुरू झालीय. कित्येक वर्षानंतर किंग खान शाहरूख खानच हा अंदाज पाहून त्याचे फॅन्स देखील आनंदात आहेत. या स ब्लॅक अॅण्ड व्हाइट फोटोंमध्ये तो बॉडी फ्लाँट करताना दिसून येतोय. वयाच्या ५५ व्या वर्षी सुद्धा शाहरूखने स्वतःला इतकं फिट ठेवल्याबद्दल त्याचं कौतुक देखील केलं जातंय. जेव्हा आपण निडर असतो तेव्हा जीवनाची शक्यता अफाट होते’, असं लिहीत सेलिब्रिटी फोटोग्राफर डब्बू रतनानी यांनी शाहरूखचा हा फोटो शेअर केलाय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dabboo Ratnani (@dabbooratnani)

अभिनेता शाहरूख खानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर सध्या तो आपल्या ‘पठान’ चित्रपटाच्या शूटिंमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत बॉलिवूडची ‘मस्तानी गर्ल’ दीपिका पादुकोण सुद्धा झळकणार आहे. यापूर्वी सुद्धा शाहरूख आणि दीपिका हे दोघेही ‘चेन्नई एक्सप्रेस’ आणि ‘हॅप्पी न्यू ईअर’ चित्रपटात दिसून आले होते. त्यानंतर आता ‘पठान’ चित्रपटात या दोघांना पुन्हा एकदा एकत्र स्कीन शेअर करताना पाहण्यासाठी फॅन्स उत्साहित आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 3, 2021 9:41 pm

Web Title: shahrukh khans shirtless look at the age of 55 viral on social media prp 93
Next Stories
1 The Kapil Sharma Show: तिसऱ्या सीजनचा पहिला गेस्ट असणार अक्षय कुमार!
2 अनुष्काच्या प्रेमात वेडा झाला विराट कोहली; ‘ये चांद सा रोशन चेहरा’ गाण्याने केलं इम्प्रेस
3 ‘इंडियन आयडल’चा ‘हा’ विजेता ‘बिग बॉस’ १५ च्या घरात दिसणार का? चर्चेला उधाण!
Just Now!
X