26 September 2020

News Flash

शकीरावर कोट्यवधींच्या कर चोरीचा आरोप

शकीराने मात्र कानांवर हात ठेवत कर चोरीचे आरोप फेटाळुन लावले आहेत.

पॉप संगीतकार शकीरा आपली आगळी वेगळी संगीत शैली व नृत्यासाठी ओळखली जाते. १९९० साली तीने तयार केलेले मागिया व पेलिग्रो हे पहिले दोन्ही म्यूझिक अल्बम सुपर फ्लॉप ठरले. परंतु त्यानंतर २०१० साली फीफा विश्वचषकात गायलेल्या वाका वाका (दिस टाइम फॉर अफ्रीका) या गाण्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली. त्यानंतर मात्र तीच्या संगीत कारकिर्दीचा सुवर्णकाळ सुरु झाला. तीचे प्रत्येक गाणे सुपरहिट ठरु लागले. आणि आज पाहता पाहता संपुर्ण जगात तीने आपले चाहते निर्माण केले आहेत. परंतु आजवर केवळ गाण्यांमुळे चर्चेत राहणारी शकीरा गेल्या काही काळात समाजमाध्यमांवर तीची झळकणारी अर्धनग्न छायाचित्रे व इतर संगीतकारांवर केलेल्या खळबळजनक वक्तव्यांमुळे ती चर्चेत राहु लागली आहे. आणि आता तर कोट्यावधी रुपयांच्या कर चोरीचा आरोप तीच्यावर लावण्यात आला आहे.

स्पॅनिश सरकारने शकीरावर १४.५ दशलक्ष यूरो म्हणजेच ११८ कोटी रुपयांच्या कर चोरीचा आरोप केला आहे. २०१५ साली ती स्पेनमधील बहामास शहरात अधिकृतरित्या स्थायिक झाली. परंतु सरकारने केलेल्या दाव्यानुसार २०१२ पासुनच ती अनधिकृतरित्या स्पेनमध्ये राहत आहे. स्पेनमधील नियमांनुसार त्या देशात अनधिकृतरित्या ६ महिन्यांपेक्षा अधिक काळ वास्तव्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तिस विशेष कर भरावा लागतो. आणि हा कर चुकवण्याचा प्रयत्न शकीराने केला आहे. शकीराने मात्र कानांवर हात ठेवत कर चोरीचे आरोप फेटाळुन लावले आहेत. याउलट स्पॅनिश कर खाते खोटे सांगत असुन आपण २०१५ सालीच प्रियकर गोरार्ड पीकसोबत स्पेनमध्ये वास्तव्यास आल्याचा प्रतिदावा तीने केला आहे. याआधी अनेकदा केवळ पर्यटक म्हणुन ती स्पेनमध्ये आली होती.

परंतु स्पॅनिश कर खाते तीच्या या विधानांवर संतुष्ट नाही. त्यांनी तीला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. शिवाय जर ती खरे सांगत असेल तर याआधी ती कोणत्या देशात वास्तव्य करत होती याचे अधिकृत प्रमाणपत्र सादर करण्यास सांगीतले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 20, 2019 3:12 am

Web Title: shakira charged with tax evasion in spain
Next Stories
1 मी नायक नाही, कलाकार आहे..
2 पुन्हा एकदा रीमिक्स..
3 राजकीय मुखवटे
Just Now!
X