News Flash

सुशांत मृत्यू प्रकरणावर येतोय चित्रपट; शक्ती कपूर साकारणार ही भूमिका

सुशांतच्या मृत्यूचं गूढ उकलणार चित्रपटातून?

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला आता दोन महिने उलटून गेले आहेत. सीबीआय आणि एनसीबीद्वारा या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. मात्र सुशांतच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान या प्रकरणावर आता एका चित्रपटाची निर्मिती केली जात आहे. लक्षवेधी बाब म्हणजे या चित्रपटात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर एनसीबी अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकणार आहेत.

अवश्य पाहा – कमी पैशांमुळे अभिनेत्रीचा ‘बिग बॉस’मध्ये जाण्यास नकार

या आगामी चित्रपटाचं नाव ‘सुशांत: न्याय- द जस्टिस’ असं आहे. राहुल शर्मा आणि सरला सारागोई हे दोघं मिळून या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. या चित्रपटात अभिनेता जुबेर खान सुशांतची भूमिका साकारणार आहे. तर रियाच्या भूमिकेत श्रेया शुक्ला झळकणार आहे. आज तकने दिलेल्या वृत्तानुसार शक्ती कपूर या चित्रपटात एनसीबी अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहेत. शिवाय अंकिता लोखंडे आणि सारा अली खान देखील या चित्रपटात झळकतील अशी शक्यता आहे. दरम्यान या चित्रपटाच्या पटकथेवर सध्या काम सुरु आहे. पुढल्या वर्षी चित्रपटाचं शूटिंग सुरु होईल अशी माहिती निर्मात्यांनी दिली.

“मला सैराट २ मध्ये काम करायला आवडेल”; बॉलिवूड अभिनेत्रीला करायचंय मराठी चित्रपटांमध्ये काम

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीत ‘बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण’ समोर आलं आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाद्वारे या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. चौकशीदरम्यान सारा अली खान, रकुल प्रित सिंह, सिमोन खंबाटा, श्रद्धा कपूर, नम्रता शिरोडकर, दीपिका पदुकोण, दिया मिर्झा, अबिगल पांडे यांसारख्या अनेक नामांकित अभिनेत्रींची नावं समोर आली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2020 4:34 pm

Web Title: shakti kapoor death of sushant singh rajput ncb movie mppg 94
Next Stories
1 “आपल्या रिलेशनशिपमुळे मी प्रसिद्ध झाले”; अभिनेत्रीने मानले ‘बिग बॉस’चे आभार
2 ‘बिग बॉस’ फेम हिमांशी खुरानाला करोना; शेतकऱ्यांच्या आंदोलनात झाली होती सहभागी
3 “इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात?” जावेद अख्तर यांचा सवाल
Just Now!
X