28 September 2020

News Flash

‘श्रद्धा कपूरला सध्या काम करु देणार नाही’- शक्ति कपूर

एका मुलाखतीमध्ये त्यांनी हा खुलासा केला आहे.

करोना व्हायरसचा वाढता फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली होती. पण आता हळूहळू अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. तसेच सरकारने चित्रपट आणि मालिकांच्या चित्रीकरणासही परवानगी दिली आहे. त्यासाठी काही नियमही आखण्यात आले आहेत. अशातच बॉलिवूड अभिनेते शक्ति कपूर यांना मुलगी श्रद्धा कपूरचे काम सध्या सुरु होऊ नये असे वाटत आहे. या मागेही एक कारण असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

श्रद्धा कपूर ही इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिचे एकापाठोपाठ एक चित्रपट प्रदर्शित होतच असतात. ती सतत चित्रीकरणामध्ये व्यग्र असते. लॉकडाउननंतर ती लवकरच चित्रीकरणास सुरुवात करणार आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, शक्ति कपूर यांनी श्रद्धाने पुन्हा चित्रीकरण करण्याबाबत वक्तव्य केले आहे.

‘मी स्वत: कामासाठी बाहेर निघणार नाही आणि नाही माझ्या कुटुंबीयांमधील कोणाला जाऊ देणार नाही. मी श्रद्धालाही कामासाठी बाहेर जाऊ देणार नाही. मला नाही वाटत अजूनही करोनाचा धोका कमी झाला आहे. मी माझ्या मुलांना घराबाहेर पडण्याची परवानगी देणार नाही’ असे शक्ति कपूर यांनी म्हटले आहे.

‘मला माहित आहे काम खूप महत्त्वाचे आहे. पण आयुष्याच्या पलिकडे काहीच नाही. मी इंडस्ट्रीमधील इतर मित्रांनाही सांगितले आहे की आपल्याला आणखी वाट पाहण्याची गरज आहे. सध्या घराच्या बाहेर पडणे थोडे धोकादायक आहे. घरात रहा सुरक्षित रहा’ असे त्यांनी पुढे म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2020 8:56 pm

Web Title: shakti kapoor will not give permission to shoot to daughter shraddha kapoor during coronavirus outbreak avb 95
Next Stories
1 पतीने शेअर केला श्वेता तिवारीचा कोस्टारसोबतचा व्हिडीओ, म्हणाला…
2 ऐश्वर्या आणि अभिषेकमध्ये भांडणानंतर कोण बोलतं पहिले सॉरी? जाणून घ्या उत्तर
3 ‘झाडावर मोठा साप…’, दीपिका चिखलिया यांनी सांगितला शूटींग दरम्यानचा भयानक किस्सा
Just Now!
X