News Flash

“हिंदू धर्माला टार्गेट करणं थांबवा, अन्यथा…”; शक्तिमान बॉलिवूड चित्रपटांवर संतापला

"तुम्ही इतर धर्मांवर टीका का करत नाही?"; मुकेश खन्ना यांचा चित्रपट निर्मात्यांना सवाल

सुपरहिरो शक्तिमान फेम अभिनेता मुकेश खन्ना आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. गेल्या काही काळात ते बॉलिवूडमधील कलाकारांवर सातत्याने टीका करत आहेत. यावेळी त्यांनी हिंदू धर्मावरुन बॉलिवूड सिनेसृष्टीवर निशाणा साधला आहे. प्रत्येक वेळी हे बॉलिवूडवाले हिंदू धर्मालाच टार्गेट का करतात? त्यांना इतर धर्म दिसत नाही का? असा संतप्त सवाल मुकेश खन्ना यांनी केला आहे.

अवश्य पाहा – “पाकिस्ताननं चोरी केली”; ‘साराभाई वर्सेस साराभाई’ची नक्कल पाहून निर्माता संतापले

अवश्य पाहा – हॉट आणि ब्युटीफूल… नुशरतच्या बिकिनी लूकबरोबरच टॅटूवरही चाहते झाले फिदा

एका युट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी बॉलिवूड चित्रपटांवर जोरदार टीका केली. “आपल्या देशात ख्रिश्चन, मुस्लिम, जैन असे अनेक धर्म आहेत. परंतु हे बॉलिवूडवाले केवळ हिंदू धर्मावरच निशाणा साधतात. हिंदू धर्मावर टीका करणाऱ्या चित्रपटांची निर्मिती करतात. कारण हिंदू लोक सहिष्णू असतात. त्यांच्यावर तुम्ही कितीही टीका करा ते तुम्हाला प्रत्युत्तर देणार नाही. कारण आमच्याकडे इतर धर्मियांसारखी संघटना नाही. परंतु या प्रकाराचा आता मी विरोध करतोय. अन् सर्व हिंदू प्रेक्षकांना माझी विनंती आहे तुम्ही देखील यांना प्रत्युत्तर द्या. जर हा प्रकार थांबला नाही तर आगामी पिढीच्या मनात हिंदू धर्माबद्दल आदर-सन्मानाची भावना राहणार नाही.” अशा आशयाचं वक्तव्य करत मुकेश खन्ना यांनी आपला संताप व्यक्त केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 17, 2020 2:40 pm

Web Title: shaktimaan mukesh khanna hinduism bollywood movies mppg 94
Next Stories
1 ‘डॉक्टर डॉन’च्या सेटवर लकी अली यांच्या गाण्यांची मैफिल
2 “आंदोलनामुळे ७० हजार कोटींचं नुकसान होतंय”; कंगनाने केली शेतकऱ्यांवर टीका
3 तब्बल १० वर्ष डेट केल्यानंतर ‘ही’ लोकप्रिय जोडी झाली विभक्त; अभिनेत्रीने शेअर केली पोस्ट
Just Now!
X