News Flash

“शक्तिमान घायल!”, मुकेश खन्ना यांनी सांगितला ‘तो’ भयानक अनुभव

काही दिवस व्हिलचेअरवर त्यांना बसावं लागलं होतं.

90 च्या दशकात टेलिव्हिजनवर एका व्यक्तीने राज्य केलं तो म्हणजे शक्तिमान. शक्तिमान या मालिकेने लहानांपासून मोठ्यांचंदेखील मनोरंजन केलं. ज्या काळात शूटिंगमधील तंत्रज्ञान फारसं विकसित नव्हतं त्या काळातही शक्तीमान या सुपरहिरोने कधी आकाशात झेप घेत तर कधी अवकाशातील ग्रहांवर जाऊन प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. त्या काळातील शक्तिमान हा पहिला काल्पनिक सुपरहिरो होता. या मालिकेने शक्तिमानची भूमिका साकारणाऱ्या मुकेश खन्ना यांना लोकप्रियता मिळाली. ही मालिका त्यांच्यासाठी टर्निंग पॉईंट होती.

या मालिकेला निरोप देऊन बराच काळ लोटला असला तरी मुकेश खन्ना यांच्या मनात अनेक आठवणी अजूनही ताज्या आहेत. नुकताच मुकेश खन्ना यांनी एक व्हिडीओ शेअर करत या मालिकेच्यावेळी घडलेल्या एका मोठ्या दुर्घटनेची आठवण सांगितली आहे. या मालिकेच्या वेळी मुकेश खन्ना तब्बल 100 फूट उंचीवरून खाली पडले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mukesh Khanna (@iammukeshkhanna)

शक्तिमान मालिकेच्या प्रक्षेपणावेळी अनेकदा कुणीही शक्तिमानसारखे स्टंट करू नये याची सूचना दिली जायची. मात्र या मालिकेच्यावेळी स्टंट करताना मुकेश खन्ना यांचा एक मोठा अपघात झाला होता. मुकेश खन्ना यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. “शक्तिमान घायल” असं म्हणत त्यांनी या घटनेचा अनुभव सांगितला आहे. मुकेश खन्ना जेव्हा 100 फूट उंचीवरून खाली येत होते तेव्हा लॅण्डिंग योग्य न झाल्याने ते खाली कोसळले आणि त्यांच्या पायाचं हाड मोडलं. त्यामुळे काही दिवस व्हिलचेअरवर त्यांना बसावं लागलं होतं.

बच्चेकंपन्नीसाठी येणाऱ्या शक्तिमान या मालिकेची निर्मिती मुकेश खन्ना यांनीच केली होती. नुकतच दूरदर्शनवर या मालिकेच पुन्हा प्रक्षेपण सुरू करण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 13, 2021 9:55 am

Web Title: shaktimaan mukesh khanna share story of accident while shooting he fall down 100 feet kpw 89
Next Stories
1 आठवड्याची मुलाखत : चित्रीकरण करणे गरजेचे आहे का?
2 बाफ्टा पुरस्कारांत ‘नोमॅडलँड’ची बाजी
3 अभिनेत्री पत्रलेखाच्या वडिलांनी घेतला अखेरचा श्वास; पोस्ट लिहित व्यक्त केल्या भावना
Just Now!
X