News Flash

“गणितात नियम नाहीत, फक्त जादू आहे”; विद्या बालनच्या ‘शकुंतला देवी’चा मजेशीर ट्रेलर पाहिलात का?

बॉलीवूडची ‘हिरो’ अशी ओळख मिरवणारी अभिनेत्री म्हणजे विद्या बालन.

विद्या बालन

बॉलिवूडची ‘हिरो’ अशी ओळख मिरवणारी अभिनेत्री म्हणजे विद्या बालन. विद्या आता पुन्हा एकदा तिच्याच भोवती केंद्रित असलेल्या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. ‘ह्युमन कॉम्प्युटर’ असा लौकिक मिळवणाऱ्या गणितज्ञ शकुंतला देवी यांच्यावरील चरित्रपटात विद्या बालन मुख्य भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. विद्याचा या चित्रपटातील नवा अवतार प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.

खूप दिवसांनी विद्याची मुख्य भूमिका असलेला चित्रपट तिच्या चाहत्यांना पाहायला मिळणार असल्याने साहजिकच चाहते सुखावले आहेत. जवळपास तीन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये शकुंतला देवी यांना असलेली गणिताची आवड, गणितामुळे त्यांनी केलेले विक्रम आणि त्यांचं खासगी आयुष्य यावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. अनू मेनन दिग्दर्शित ‘शकुंतला देवी – ह्य़ुमन कॉम्प्युटर’ हा चित्रपट स्वीकारल्यानंतर जवळपास चार महिने विद्याने शकुंतला देवी कोण होत्या, त्यांचा अभ्यास, त्यांचे कौशल्य, त्यांचे एकूणच व्यक्तिमत्त्व समजून घेऊन भूमिकेची तयारी करण्यासाठी घेतले. त्यानंतर चरित्रपटासाठी महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे ज्या व्यक्तीवर आधारित चित्रपट आहे, त्या व्यक्तीशी साधम्र्य साधणारा लूक.. इथेही विद्याने बाजी मारली आहे.

या चित्रपटात ‘दंगल गर्ल’ सान्या मल्होत्रा विद्याच्या मुलीची भूमिका साकरत आहे. त्यासोबतच जिशू सेनगुप्ता आणि अमित साध यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ‘शकुंतला देवी’ हा चित्रपट येत्या ३१ जुलै रोजी अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2020 12:25 pm

Web Title: shakuntala devi trailer vidya balan math genius believes it is drama or nothing watch video ssv 92
Next Stories
1 सलमान आणि शिल्पाचा ‘चांद छुपा बादल में’वर रोमँटीक अंदाज, व्हिडीओ व्हायरल
2 Bigg Boss 14 : ‘बिग बॉस’च्या घरात होणार या चर्चेतल्या सेलिब्रिटींची एण्ट्री?
3 ‘इश्कबाज’फेम अभिनेत्री श्रेनू पारिखला करोनाची लागण
Just Now!
X