News Flash

शमा सिकंदरच्या न्यूड फोटोचा सोशल मीडियावर धुमाकुळ; सनी लिओनीची केली कॉपी

या फोटोला शेअर करत एक कॅप्शन देखील लिहिली आहे. 'हॅट का मौसम है' असं लिहिल तिने आपला हॅपी मूड चाहत्यांसोबत शेअर केलाय.

सोशल मीडियावर न्यूड फोटो शेअर करणं हे आता काही नविन राहिलेलं नाही. मात्र आजही जेव्हा सेलिब्रिटी न्यूड फोटो टाकतात, तेव्हा एकच खळबळ उडते. नुकतंच टीव्ही अभिनेत्री शमा सिकंदर हिने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर न्यूड फोटो शेअर केलाय. तिच्या या न्यूड फोटोशूटने सोशल मीडियावर एकच धुमाकुळ माजला आहे. पण तिने केलेल्या या फोटोशूटवर ‘फॅशन कॉपी’चा आरोप करण्यात येतोय.

टीव्ही अभिनेत्री शमा सिकंदर ही केवळ तिच्या लूकसाठीच नव्हे तर तिच्या बोल्ड अंदाजासाठी देखील कायम चर्चेत असते. ती तिच्या सोशल मीडिया अकाउंट बरीच सक्रिय असते. सध्या ती एका न्यूड फोटोमुळे चर्चेत आलीय. शमाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक न्यूड फोटो शेअर केलाय. अभिनेत्री शमा सिकंदर हिने न्यूयॉर्कमधून हा फोटो शेअर केलाय. ती सध्या तिचा बॉयफ्रेंड जेम्स मिलिरॉन सोबत क्वालिटी टाइम घालवत आहे.
या फोटोमध्ये शमा तिच्या घराच्या एका खिडकीला पाठ टेकवत, नजर खाली झुकवत पोज देताना दिसून आली. यात ती एका मोठ्या आकाराच्या टोपीने आपलं शरीर लपवताना दिसून आली. व्हाइट बॅकड्रॉप आणि खुल्या केसांमुळे या अभिनेत्रीच्या लुकमध्ये आणखी ग्लॅमर झळकताना दिसला. शमाने या फोटोला शेअर करत एक कॅप्शन देखील लिहिली आहे. ‘हॅट का मौसम है’ असं लिहिल तिने आपला हॅपी मूड चाहत्यांसोबत शेअर केलाय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shama Sikander (@shamasikander)

टीव्ही अभिनेत्री शमा सिकंदर ही जरी टीव्ही क्षेत्रापासून सध्या दूर असली तरी ती तिच्या बोल्ड फोटोमुळे सोशल मीडियावर धुमाकुळ घालत असते. शमाने शेअर केलेला हा फोटो पाहून तिचे चाहते देखील दिवाने झाले आहेत. तिच्या या फोटोवर कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडत फॅन्स तिच्या सौंदर्याचं कौतूक करताना दिसून येत आहेत. एका युजरे तिला ‘गॉर्ज‍ियस’ तर काही युजर तिला ‘सेंसुअस’ म्हणत आहेत. एक यूजरने तर तिची तुलना सनी लिओनीसोबत करून “सनीच्या सौंदर्यापेक्षाही खूप जास्त…” अशी कमेंट केली आहे.

काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री सनी लिओनीचा न्यूड फोटोशूट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. त्यानंतर आता टीव्ही अभिनेत्री शमा सिकंदर हिने अगदी सनी लिओनीशी मिळता-जुळता न्यूड फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये तिने सनी लिओनीसारखंच एका टोपीने आपल्या बॉडीला कव्हर केलंय. त्यामूळे तिच्यावर ‘फॅशन कॉपी’ चा आरोप करण्यात येतोय. तरीही तिचा हा फोटो तिच्या फॅन्ससाठी एखाद्या ट्रीटपेक्षा काही कमी नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shama Sikander (@shamasikander)

अभिनेत्री शमा सिकंदर हिने २००३ मध्ये टेलिव्हिजन मालिका ‘ये मेरी लाइफ है’ मधून करिअरची सुरुवात केली. ‘बालवीर’ मध्ये ‘भयंकर परी’च्या भूमिकेतून शमा प्रसिद्धीझोतात आली. शमा टेलिव्हिजन आणि बॉलिवूडमधील करिअरनंतर विदेशात स्थायिक झाली. शमाने अनेक चित्रपटांमध्ये साइड रोल्स केले आहेत. पण अचानक एक दिवस ती लाइमलाइटमधून बाहेर गेली. शमाने कॉस्मेटिक सर्जरी केल्यानंतर तिला ओळखणंही कठीण झालं होतं. परंतू सध्याच्या तिच्या न्यूड फोटोमुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2021 4:58 pm

Web Title: shama sikander naked photo viral covering her body with big hat prp 93
Next Stories
1 ‘माझ्या मुलीच्या फोटोशी छेडछाड करण्याची दिली धमकी’, केआरकेने मिका विरोधात केली तक्रार
2 वीरू राजकारणात ठरणार ‘लयभारी’
3 या दिवशी प्रदर्शित होणार ‘तुफान’ चित्रपट
Just Now!
X