News Flash

शिल्पा शेट्टीवर होणाऱ्या टीकेवर बहिण शमिताने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया म्हणाली…

शमिताचे हे ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे.

shamita shetty, Raj Kundra, Shilpa Shetty,
शमिताचे ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी पती राज कुंद्राच्या अटकेनंतर तिला अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो आहे. आता शिल्पा शेट्टीची बहिण शमिता शेट्टी तिच्या समर्थनार्थ पुढे आली आहे. शमिताने ट्विटरवर पोस्ट शेअर करत सकारात्मक राहण्याचा संदेश दिला आहे.

शमिताने ट्विटरवर सलग दोन ट्वीट केले आहेत. पहिल्या ट्वीटमध्ये शमिताने स्वत: चा फोटो शेअर केला आहे. या फोटोत शमिताने काळ्या रंगाचा टॉप परिधान केला आहे. हा फोटो शेअर करत “कधी कधी आपल्यात असलेली शक्ती ही कायम एखाद्या मोठ्या अग्नीच्या स्वरूपात कोणाला दिसत नाही, ती एखाद्या लहान ठीणगीच्या रूपाम जिवंत असते…तू पुढे जात रहा. लोकांना आपल्याबद्दल काय वाटतं किंवा ते आपल्याविषयी काय विचार करतात यावर आपण नियंत्रण करू शकत नाही,” अशा आशयाचे ट्वीट शमिताने केले आहे.

आणखी वाचा : ‘राज कुंद्रा मला किस करत म्हणाला, माझे शिल्पासोबतचे संबंध ठीक नाहीत आणि…’, शर्लिन चोप्राचा धक्कादायक दावा

तर पुढच्या ट्वीटमध्ये शमिता म्हणाली, “सध्या ते ज्याकाही वैयक्तिक समस्यांमधून जात आहेत आणि..त्याच्याशी तुमचा काही संबंघ नाही. त्यामुळे प्रामाणिकपणे आणि प्रेमाने तुम्ही तुमचं काम करत रहा.”

आणखी वाचा : याला म्हणतात खरं प्रेम! विक्रम बत्रा यांची प्रेयसी आजही आहे अविवाहीत

राज कुंद्राला पॉर्न चित्रपटांची निर्मिती आणि अॅपवर अपलोड केल्याप्रकरणी १९ जुलै रोजी मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली. अटकेपूर्वी मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलकडून राज कुंद्राची सात ते आठ तास चौकशी करण्यात आली. यावेळी पॉर्न चित्रपट आणि पॉर्न अॅप प्रकरणात एक महत्त्वाची माहिती समोर आली. तर यात शिल्पाही असू शकते अशा चर्चा रंगल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2021 5:23 pm

Web Title: shamita shetty came in support of shilpa shetty in raj kundra porn controversy dcp 98
Next Stories
1 लेडी सुपरस्टार नयनताराच्या ‘नेत्रिकन’चा ट्रेलर रिलीज; युट्यूबवर होतोय ट्रेंड
2 “टोमॅटो कसे दिले?”; “त्या” फोटोमुळे अभिनेत्री टिना दत्ता ट्रोल
3 Video: ‘ओ शेठ’ या गाण्याने सोशल मीडियावर केला आहे कल्ला…जाणून घ्या गाण्यामागची गोष्ट
Just Now!
X