News Flash

“राकेश बापट आवडतो पण तो थोडा…”; शमिता शेट्टीने व्यक्त केल्या भावना

दिवसेंदिवस राकेश आणि शमितामध्ये जवळीक वाढत असल्याचं पाहायला मिळतंय.

raqesh-bapat-shamita-shetty
(Photo-Instagram@voot)

‘बिग बॉस ओटीटी’मध्ये सध्या राकेश बापट आणि शमिता शेट्टी यांची चर्चा अधिक रंगत असल्याचं दिसून येतंय. दिवसेंदिवस राकेश आणि शमितामध्ये जवळीक वाढत असल्याचं पाहायला मिळतंय. अशात अनेक नेटकरी शमिता आणि राकेश केवळ शोसाठी हा दिखावा करत असल्याच्या चर्चा करत आहेत. मात्र अखेर शमिता शेट्टीने राकेश बापटबद्दल तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

वूटने नुकत्याच शेअर केलेल्या ‘बिग बॉस ओटीटी’च्या व्हिडीओत शमिताने नेहा भसीनसमोर तिच्या भावना व्यक्त केल्याचं दिसतंय. या व्हिडीओत नेहाने शमिताला तिला राकेश आवडतो का? असा थेट प्रश्न विचारला आहे. यावर शमिता म्हणाली, “हो नक्कीच आम्ही एकमेकांना पसंत करतो. तो खूप प्रेमळ आहे. मात्र कधी कधी तो खूप गोंधळलेला वाटतो त्यामुळे मला त्याचा त्रास होतो. कारण मी अजिबात कन्फ्यूज नाही आहे. मी जेव्हा एखादा निर्णय घेते तेव्हा मी त्यावर ठाम असते.” असं शमिता म्हणाली आहे.

हे देखील वाचा: कुणीतरी येणार येणार गं!, खुशबू तावडे आणि संग्राम साळवीने चाहत्यांना दिली गूड न्यूज

 

View this post on Instagram

 

A post shared by Voot (@voot)

खरं तर याशोमध्ये शमिताने राकेशकडे आधीच तिच्या भावना व्यक्त केल्या होत्या. राकेश तिला आवडतं असल्याचं तिने सांगितलं होतं. गेल्या काही दिवसांपासून शमिता आणि राकेशमध्ये नातं फुलंत असल्याचं दिसून येतंय. शोमधील इतर स्पर्धकांशी राकेशने जवळीक साधलेली शमिताला पटत नसल्याचंदेखील दिसून आलंय. तर राकेश आणि शमिताने शोमध्ये काही रोमॅण्टिक क्षण देखी एन्जॉय केले आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2021 11:56 am

Web Title: shamita shetty share her feeling for rakesh bapat in big boss ott video goes viral kpw 89
Next Stories
1 कुणीतरी येणार येणार गं!, खुशबू तावडे आणि संग्राम साळवीने चाहत्यांना दिली गूड न्यूज
2 ‘एकच फाइट वातावरण टाइट’, उर्वशी रौतेलाच्या दबंग अंदाज व्हायरल
3 Bigg Boss OTT: शॉकिंग एलिमिनेशन! पुन्हा एकदा बेघर झाले गाबा-अक्षराची जोडी
Just Now!
X