News Flash

लेकीने चित्रपटात बोल्ड सीन दिल्यास संजय कपूरची असेल ‘अशी’ प्रतिक्रिया

याचा खुलासा शनायाची आई महीपने एका मुलाखतीत केला आहे.

बॉलिवूड अभिनेता संजय कपूरची लेक शनाया कपूरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नसले, तरी तिचे लाखो चाहते आहेत. तिची लोकप्रियता ही कोणत्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. लवकरच, शनाया दिग्दर्शक करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. दरम्यान, शनायाने चित्रपटात किसींग सीन दिला तर त्यावर संजयची काय प्रक्रिया असेल याचा खुलासा शनायाची आई महीप कपूरने केला आहे.

महीपने नुकतीच ‘पीपींगमुनला’ मुलाखत दिली. या मुलाखतीत महीपने हा खुलासा केला आहे. “संजय त्याच्या मुलीच्या कामात हस्तक्षेप करणार नाही. आतमध्ये संजय स्वत: शी बोलत असेल की, मी हे काय बघतोय? पण जेव्हा हे काम आहे हे त्याच्या लक्षात येईल तेव्हा तो गप्प बसेल,” असे महीप म्हणाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shanaya Kapoor (@shanayakapoor02)

संजय कधीकधी शनायाच्या चाहत्यांना चुकीचं उत्तर देखील देतो. याचा एक किस्सा महीपने सांगितला. महीप म्हणाली, “तिचे लाखो चाहते आहेत. त्यामुळे तिला अनेक मेसेजेस येतात. त्यावेळी या लोकांमध्ये संजयचा अनेकवेळा घोळ होतो. एका चाहत्यांने ‘लव्ह यू, डॅड’ अशी कमेंट केली. तर, त्याला उत्तर देत ‘लव्ह यू बॅक, शनाया’ असा मेसेज संजयने केला. त्यावेळी मी म्हणाली की कोणत्या शनायाला तुम्ही मेसेज करत आहात? तो गोंधळला आणि म्हणाला ‘अरे, ही शनाया नाही का?’ आणि मी नाही म्हणाले. या सगळ्या गोष्टींची आम्ही अपेक्षा केली नव्हती. मात्र, हे सगळं पाहून आम्हाला खूप चांगले वाटते.”

आणखी वाचा : प्रियांकाच्या नवऱ्याच्या मोबाइलमध्ये आहे Sex Playlist; त्यामधील गाण्यासंदर्भातील केला खुलासा

दरम्यान, शनाया नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘फॅब्युलस लाइव्ह्स ऑफ बॉलिवूड वाईफ्स’ या वेब सीरिजमध्ये होती. मार्च मध्ये एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत शनाया बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची बातमी करण जोहरने दिली होती. यापूर्वी, शनायाने ‘गुंजन सस्केना : द कारगिल गर्ल’ या चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. या चित्रपटात तिची चुलत बहिन जान्हवी कपूरने मुख्य भूमिका साकारली होती.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 12, 2021 10:22 am

Web Title: shanaya kapoor s intimate scenes on screen will elicit this response from her dad sanjay kapoor dcp 98
Next Stories
1 सलमानने मागितली थिएटर्स मालकांची माफी; म्हणाला, “मला माफ करा….”
2 “ओव्हर अ‍ॅक्टिंग की दुकान..टॅटू काढताना दुखलं नाही का?”; ‘त्या’ फोटोंमुळे अभिनेत्री ट्रोल
3 सोशल मीडियावर मुकेश खन्ना यांच्या निधनाची अफवा, शक्तिमान म्हणाला “मी पूर्णपणे ठीक आहे.”
Just Now!
X