25 February 2021

News Flash

शंकर महादेवनने या होतकरु गायकांना दिली संधी

त्याच्या आगामी सूरमा सिनेमात गाणार गाणी

शंकर महादेवन

‘रायझिंग स्टार २’ या लाइव्ह सिंगिंग रिअॅलिटी शोमध्ये शँकर महादेवन हे परीक्षक आहे. महादेवन यांनी यावेळी हेमंत ब्रिजवासी आणि अख्तर ब्रदर्स (शेहनाझ व साहिल) या स्पर्धकांना त्यांच्या आगामी सिनेमात गाण्याची सुवर्णसंधी देऊ केली आहे. हेमंत ब्रिजवासी आणि अख्तर ब्रदर्स यांनी अतिशय चांगले पॉवर पॅक परफॉर्मन्स लागोपाठ सादर करून स्पर्धक म्हणून रायजिंग स्टार शोमध्ये थोड्याच वेळात सर्वांचे चाहते झाले. या तिघांचे टॅलेंट वाया नजाता दस्तूर खुद्द शंकर यांनी त्यांच्या आगामी सूरमा सिनेमात गाण्याची संधी दिली आहे. सूरमा या सिनेमात रायझिंग स्टार २ चा परीक्षक दिलजीत दोसांजची मुख्य भूमिका आहे. या सिनेमाला संगीत दिले आहे शंकर-एहसान- लॉय यांनी आणि त्याची गीते लिहिली आहेत गुलजार यांनी. या गाण्याचे रेकॉर्डिंग या आठवड्यात होणार आहे. सध्या स्पर्धक आणि त्यांचे पालक शंकर महादेवन यांच्यासाठी गायला मिळणार म्हणून भलतेच खूश झाले आहेत.

हेमंत ब्रिजवासी आणि अख्तर ब्रदर्सच्या निवडीबद्दल बोलताना शंकर महादेवन म्हणाले की, ‘हेमंत ब्रिजवासी आणि अख्तर ब्रदर्स अतिशय टॅलेंटेड आहेत. दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ त्यांना मार्गदर्शन करत असताना त्यांचा परफॉर्मन्स प्रत्येक दिवशी जास्त चांगला होत गेलेला मला दिसून आला. आगामी फिचर फिल्म सूरमाचे गाणे गुलजारजी यांनी लिहिले आहे आणि एहसान, लॉय आणि मी त्याची संगीतरचना केली आहे. आम्ही त्या गाण्याला सुयोग्य आवाजाच्या शोधात होतो. मला सांगायला अतिशय आनंद होत आहे की आमचा शोध रायझिंग स्टार २ वरील स्पर्धक हेमंत आणि अख्तर ब्रदर्स यांच्या कडे येऊन संपला आणि मला खात्री आहे की ते त्या गाण्याला योग्य न्याय देतील.’ अधिक माहितीसाठी, पाहत रहा ‘रायझिंग स्टार २’ प्रत्येक शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता फक्त कलर्सवर!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2018 9:14 pm

Web Title: shankar mahadevan gives reality show rising star 2 contestants a bollywood break
Next Stories
1 गाव गाता गजाली मालिका घेणार तात्पुरता निरोप
2 घटस्फोटीत पत्नीच्या प्रियकराच्या ‘त्या’ फोटोवर फरहान अख्तरने दिली प्रतिक्रिया
3 ‘मणिकर्णिका’मधील अंकिताचा लूक व्हायरल
Just Now!
X