News Flash

मराठी चित्रपटात शरद केळकर अनोख्या भूमिकेत

शरदने त्याच्या सोशल मिडिया अकाऊंटवरून या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला आहे आणि या टीझरमधून शरदच्या लूकची आणि भूमिकेची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे.

sharad kelkar
शरद केळकर

अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा पती आणि ‘मुंबापुरी प्रॉडक्शन’चे मोहसिन अख्तर ‘माधुरी’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत. नवरात्रीच्या दिवसात टीझर पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आल्यानंतर या चित्रपटाविषयीची कमालीची उत्सुकता वाढली आहे. एका सुंदर नात्याची गोष्ट सांगणा-या ‘माधुरी’ या चित्रपटात सोनाली कुलकर्णीसह अभिनेता शरद केळकरची पण महत्त्वाची भूमिका आहे. नेहमी वेगवेगळ्या भूमिका साकारणारा शरद या चित्रपटात प्रेक्षकांनी कधीही न पाहिलेल्या एका हटके रुपातून दिसणार आहे. नुकतंच, शरदने त्याच्या सोशल मिडिया अकाऊंटवरून या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला आहे आणि या टीझरमधून शरदच्या लूकची आणि भूमिकेची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे.

‘माधुरी’ मधील शरद केळकरच्या आगळ्या-वेगळ्या भूमिकेविषयी बोलताना निर्माते मोहसिन अख्तर यांनी म्हटले की, “शरदने जे पात्रं साकारलं आहे त्या पात्राविषयी मी फार विचार केला. शरदची आणि माझी खुप जुनी ओळख आहे. शरदचं काम मी पाहिलंय आणि त्यामुळे माझ्या पात्राच्या ज्या गरजा आहेत त्यात शरद एकदम फीट बसतो. शरदचं अभिनय, त्याचा आवाज, त्याचा लूक या सगळ्या गोष्टी फार कमाल आहेत आणि ‘माधुरी’ मध्ये शरदने अप्रतिम काम केलंय. प्रेक्षकांना त्याने या कधी नं साकारलेलं पात्रं पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातील शरदचे काम पाहिल्यावर मला खात्री आहे की शरद मराठी सिनेमामध्ये एक छाप सोडेल इतका त्याचा अभिनय अप्रतिम आहे”.

वाचा : हर्षवर्धन करतोय युवराज सिंगच्या एक्स गर्लफ्रेंडला डेट?

सोनाली आणि शरद यांच्यासोबतीला मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना एक नवा चेहरा पाहायला मिळणार आहे. तो नवा चेहरा म्हणजे संहिता जोशी. या चित्रपटातील एका महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी संहिताची निवड करण्यात आली आहे. ‘माधुरी’ हा चित्रपट येत्या ३० नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 24, 2018 4:39 pm

Web Title: sharad kelkar playing different role in upcoming marathi movie madhuri
Next Stories
1 #MeToo : बळजबरीने कपडे काढण्याचा प्रयत्न; अभिनेत्री सोनल वेंगुर्लेकरचा अंगावर काटा आणणारा अनुभव
2 हर्षवर्धन करतोय युवराज सिंगच्या एक्स गर्लफ्रेंडला डेट?
3 ‘राज-सिमरन’ जोडीने मराठा मंदिरमध्ये केला विक्रम
Just Now!
X