News Flash

VIDEO : शिवाजी नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणा…

असे म्हणताच कलाकारावर टाळ्यांचा वर्षाव झाला असून व्हिडीओ व्हायरल झाला आहे

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात मावळ्यांचे अनन्यसाधरण महत्व आहे. याच शिवकालीन इतिहासाच्या पानांमधील तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची कथा बॉलिवूड अभिनेता अजय देवगण ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाच्या रुपात रुपेरी पडद्यावर आणणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात नरवीर तान्हाजी मालुसरे यांची भूमिका अभिनेता अजय देवगण साकारणार असून छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका मराठमोळा अभिनेता शरद केळकर वठवणार आहे. ‘तान्हाजी’ चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनावेळी चित्रपटातील काही कलाकारांनी मीडियाशी संवाद साधला. दरम्यान असा काही किस्सा घडला घडला की उपस्थित असलेल्या सर्वांनी अभिनेता शरद केळकरवर टाळ्यांचा वर्षाव केला.

‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शित करताना अजय देवगण, सैफ अली खान, शरद केळकर आणि चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना चित्रपटाशी संबंधीत अनेक प्रश्न विचारण्यात आले. चित्रपटात शरद केळकर साकारत असलेल्या शिवाजी महाराजांच्या भूमिकेबद्दल त्याला प्रश्न विचारण्यात आला होता. तो प्रश्न विचारताना एकाने शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला. शरद केळकरला ते खटकलं आणि त्याने महाराजांना ‘छत्रपती शिवाजी महाराज’ असे म्हणायला सांगितले. शरदच्या मनातील शिवाजी महाराजांचा आदर पाहून तेथे उपस्थित असलेल्या सर्वांनी त्याच्यावर टाळ्यांचा वर्षाव केला.

यापूर्वी सोनी वाहिनीवरीव अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत असलेला ‘कौन बनेगा करोडपती’ हा रिअॅलिटी शो मध्ये बिग बींनी शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला होता. त्यावेळी ‘यापैकी कोणता शासक मुघल सम्राट औरंगजेबचा समकालीन होता?’ असा प्रश्न विचारण्यात आला. त्यासाठी १. महाराणा प्रताप, २. राणा सांगा, ३. महाराजा रणजीत सिंह, ४. शिवाजी हे पर्याय देण्यात आले होते. तुम्ही औरंगजेबच्या नावापुढे ‘मुघल सम्राट’ लावू शकता तर राज्याभिषेक झालेल्या छत्रपतींचा उल्लेख एकेरी का?, असा प्रश्न उभा करत शो बंद करण्याची मागणी त्यावेळी करण्यात आली होती. त्यानंतर सोनी वाहिनीने त्यांच्या चुकीची माफी मागितली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2019 8:36 am

Web Title: sharad kelkar tell person to give respect to chatrapati shivaji maharaj avb 95
Next Stories
1 कलाक्षेत्रात टाकलेलं पाऊल योग्य
2 शाहरुख आणि राजकुमार हिरानी पहिल्यांदाच करणार एकत्र चित्रपट?
3 शक्ती मिल बलात्कार प्रकरणावर आधारीत आहे मर्दानी-2 ?
Just Now!
X