20 November 2019

News Flash

सावरकरांची ‘जन्मठेप’ वाचून कर्करोगाशी लढण्याची प्रेरणा मिळाली- शरद पोंक्षे

सहा महिने कर्करोगाशी झुंज दिल्यानंतर अभिनेते शरद पोंक्षे पुन्हा एकदा नाटकाच्या तालमीसाठी सज्ज झाले आहेत.

तब्बल सहा महिने कर्करोगाशी झुंज दिल्यानंतर अभिनेते शरद पोंक्षे पुन्हा एकदा नाटकाच्या तालमीसाठी सज्ज झाले आहेत. ‘हिमालयाची सावली’ या नाटकातून ते पुनरागमन करत आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत याविषयी ते म्हणाले, ‘माणूस आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांवरून जात असतो आणि काही संकटं अचानक येतात. तसं डिसेंबरमध्ये मला अचानक बरं वाटेनासं झालं आणि कर्करोगाचं निदान झालं. मला त्या गोष्टीची प्रसिद्धी नको होती. म्हणून मी कुठेही सोशल मीडियावर फोटो टाकला नाही. मला खोटी सहानुभूती नको होती. पण आता सांगायला काही हरकत नाही कारण मी ती लढाई जिंकलोय.’

कर्करोगाशी झुंज देताना सावरकरांची ‘जन्मठेप’ वाचून प्रेरणा मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. ‘हा काळ फार भयंकर होता. कारण मी २५ वर्षांत एकही दिवस रजा न घेता काम केलंय. सगळे दिवस व्यापलेले होते. अशा व्यक्तीला पहिले तीन महिने तर उंबरठाही ओलांडायचं नव्हतं. त्यामुळे हे सगळं फार भयंकर होतं. पण अशा वेळी ‘जन्मठेप’ परत एकदा वाचावंसं वाटलं. अकरा वर्ष एका छोट्या खोलीत साखळदंडाने बांधलेला माणूस आपल्या देशासाठी एवढं काही करू शकतो, तर मला तर फक्त सहा महिने त्रासातून काढायचे होते.’

सहा महिने घेतलेल्या औषधोपचार आणि किमोथेरेपीमुळे या आजारातून पूर्णपणे बरे झालो असल्याचे सांगत आता पुन्हा एकदा रंगभूमीवर येण्यासाठी सज्ज झालो असल्याचं त्यांनी सांगितलं.

First Published on July 17, 2019 10:57 am

Web Title: sharad ponkshe on his journey while fighting with cancer ssv 92
Just Now!
X