News Flash

एखाद्याचा खून केल्यानं कुणी दहशतवादी होत नाही- शरद पोंक्षे

'दहशतवाद ही संकल्पनाच वेगळी असून एखाद्याची विचारसरणी न पटल्याने त्याचा खून करणे ही गोष्ट वेगळी आहे.'

शरद पोंक्षे

एखाद्याचा खून केल्यानं कुणी दहशतवादी होत नाही असं म्हणत अभिनेते शरद पोंक्षे यांनी कमल हासन यांचा निषेध केला आहे. ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे हा स्वातंत्र्योत्तर भारतातील पहिला हिंदू दहशतवादी होता,’ असे विधान अभिनेते आणि मक्कल निधी मय्यम पक्षाचे संस्थापक कमल हासन यांनी केलं होतं. या विधानावरून मोठे वादंग उठले आहे.

‘न्यूज १८ लोकमत’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कमल हासन यांच्या वक्तव्याचं समर्थन करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी म्हणाले, ‘जेव्हापासून भाजपा सत्तेत आहे तेव्हापासून गोडसेचं समर्थन सुरू आहे.’ यावर प्रत्युत्तर देत शरद पोंक्षे म्हणाले, ‘नथुराम गोडसे हे नाटक काँग्रेस सत्तेत असताना आलं. भाजपा आणि शिवसेनेची सत्ता असताना नाटकावर बंदी आणली होती. मग आता असं म्हणायचं का की काँग्रेसने नथुराम गोडसेला पाठिंबा दिला?’

‘दहशतवाद ही संकल्पनाच वेगळी असून एखाद्याची विचारसरणी न पटल्याने त्याचा खून करणे ही गोष्ट वेगळी आहे. एखाद्याचा खून केल्यानं कुणी दहशतवादी होत नाही,’ असंदेखील पोंक्षे म्हणाले.

शरद पोंक्षे यांनी फेसबुकवर पोस्ट लिहित कमल हासन यांचा निषेध केला होता. ‘हिंदू धर्म हा मुळातच सहिष्णूवादी. इतिहास साक्ष आहे की हिंदूंनी कधीही दहशतवादी कारवाया केल्या नाहीत. आक्रमणं केली नाहीत. आम्ही प्रत्येक मुसलमानाकडे दहशतवादी म्हणून बघतच नाही. म्हणूनच जगात मुसलमान सर्वात सुरक्षित व सुखी कुठे राहत असतील तर ते हिन्दुस्थानात आणि हे कित्येक मुसलमानांचं मत आहे. पण तरीही एक अभिनेता केवळ राजकीय स्वार्थासाठी हिंदू दहशतवादी असा उल्लेख करतोय तेही जाहिरपणे आणि आपण ते खपवून घेतो. हाच हिंदूंचा सहिष्णूपणा,’ असं त्यांनी फेसबुकवर लिहिलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 15, 2019 11:48 am

Web Title: sharad ponkshe on kamal haasan terrorist godse remark
Next Stories
1 बाजीराव-मस्तानी पुन्हा एकदा एकत्र, ‘या’ चित्रपटात करणार स्क्रीन शेअर
2 आयुष्मानसोबत पहिल्यांदाच काम करणार बिग बी
3 ‘दहशतवादाला धर्म नसतो’, विवेक ओबेरॉयचा कमल हासन यांना टोला
Just Now!
X