01 December 2020

News Flash

“माझ्याकडे सलमानचा नंबर नाही”; बेरोजगार अभिनेता मागतोय काम

'बिग बॉस'मधून एलिमिनेट झालेला अभिनेता बेरोजगार

बिग बॉस हा छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय रिअॅलिटी शोंपैकी एक म्हणून ओळखला जातो. या शोमध्ये झळकणाऱ्या कलाकारांना रातोरात तुफान प्रसिद्धी मिळते. या प्रसिद्धीचा फायदा त्यांच्या करिअरमध्ये देखील मिळतो. परंतु अभिनेता शार्दुल पंडित मात्र त्याला अपवाद ठरत आहे. बिग बॉसच्या १४ सिझनमधून नुकताच एलिमिनेट झालेला हा अभिनेता सलमान खानकडे काम मिळवण्यासाठी विनंती करत आहे.

अवश्य पाहा – बिग बी-नागराज यांच्या ‘झुंड’चे प्रदर्शन अडचणीत; सर्वोच्च न्यायालयानेच घातली बंदी

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत शार्दुलने आपल्या सद्य परिस्थितीवर भाष्य केलं. तो म्हणाला, “सध्या मी बेरोजगार आहे. माझी आर्थिक परिस्थिती देखील खूप खालावली आहे. मला कामाची अत्यंत गरज आहे. काही पैसे मिळतील म्हणून मी बिग बॉसमध्ये भाग घेतला. परंतु या शोमध्ये मी दिर्घ काळ टिकू शकलो नाही. या शोनं मला प्रसिद्धी मिळवून दिली पण काम नाही. बिग बॉसमधून एलिमिनेट झाल्यावर मला सलमाननं काम मिळवून देण्याचं आश्वासन दिलं होतं. माझ्याकडे सलमानचा नंबर नाही. पण कृपया सलमाननं माझी हाक ऐकावी अन् मला काम मिळवून द्यावं ही एकमेव विनंती आहे.”

अवश्य पाहा – ही दोस्ती तुटायची नाय; ‘ग्रॅव्हिटी’ सुपरहिट होताच अभिनेत्याने मित्रांमध्ये वाटले ७४ कोटी

बिग बॉसमध्ये झळकलेल्या अनेक कलाकारांना सलमानने आजवर काम मिळवून देण्यासाठी मदत केली आहे. अनेक कलाकारांनी बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर पुन्हा एकदा करिअरमध्ये जोरदार पुनरागमन केल्याचं आपण पाहिलं आहे. या पार्श्वभूमीवर सलमान आता शार्दुलला देखील मदत करणार का? याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2020 7:49 pm

Web Title: shardul pandit salman khan bigg boss 14 mppg 94
Next Stories
1 करोना काळात BTS ने दिला खास संदेश; ‘लाइफ गोज ऑन’गाणं प्रदर्शित
2 सलमान खान ‘तेरे नाम’च्या सिक्लवमध्ये झळकणार का? दिग्दर्शक म्हणाला…
3  देवमाणूसमधील ‘ही’ अभिनेत्री आहे स्वप्नील जोशीची जबरा फॅन
Just Now!
X