News Flash

‘३ इडियट्स’मधील रँचो आणि फरहानला झाला करोना, राजूला वाटते भीती म्हणाला..

आर माधवनने करोना झाल्याचे सांगताना ३ इडियट्समधील पोस्टर शेअर केले होते.

काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता आमिर खानला करोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली होती. त्यापाठोपाठ बॉलिवूड अभिनेता आर माधवनला देखील करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले. माधवनने सोशल मीडियावर ३ इडियट्स या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत मजेशीर पोस्ट लिहिली होती. या पोस्टवर आता अभिनेता शर्मन जोशीने उत्तर दिले आहे.

आर माधवनने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर ‘फरहानने नेहमीच रँचोला फॉलो केले आहे आणि व्हायरस नेहमी आमच्या मागेच असतो. पण त्याने आम्हा दोघांनाही पकडले आहे. पण ऑल इज वेल आणि आम्ही लकरच बरे होऊ. ही अशी जागा आहे जिकडे राजू पोहोचू नये असे आम्हाला वाटते’ या आशयाचे मजेशीर ट्वीट करत ३ इडियट्समधील पोस्टर शेअर केले होते.

PHOTOS: आर माधवनचे मुंबईमधील आलिशान घर एकदा पाहाच

आता शर्मन जोशीने आर माधवनला भन्नाट उत्तर दिले आहे. ‘मला आशा आहे की मी तुमच्या क्लबमध्ये सामील होणार नाही… पण मॅडी तू खान लिहिलं आहेस. फनी आहे’ या आशयाचे ट्वीट शर्मन जोशीने केले आहे. त्यावर आर माधवनने उत्तर देत ‘हाहाहा… हो भाई. तू सुरक्षित आणि निरोगी रहा’ असे म्हटले आहे.

देशावर पुन्हा एकदा करोनाचं संकट घोंगावू लागलं आहे. पहिल्या लाटेवर मात केल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर येत असतानाच करोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. महाष्ट्रासह देशातील अनेक राज्यांत करोना रुग्णांची संख्या वेगानं वाढत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2021 12:42 pm

Web Title: sharman joshi witty reply to 3 idiots co star r madhavans post about covid 19 avb 95
Next Stories
1 सेटवर असतानाच आईचा फोन आला…, ‘अनुपमा’मधील अभिनेत्याच्या वडिलांचं निधन
2 …म्हणून वयाची ४० उलटल्यानंतरही अक्षय खन्ना अविवाहित
3 होळीच्या पुजेत संजना होणार सामिल? ‘आई कुठे काय करते’मध्ये वेगळे वळण
Just Now!
X