24 February 2021

News Flash

करीना कपूरने शेअर केला सासूबाईंचा ‘तो’ खास फोटो; म्हणाली…

करीनाने शेअर केला शर्मिला टागोर यांचा 'तो' खास फोटो

मनमोहक सौंदर्य आणि अभिनयशैलीच्या जोरावर ६०-७० चा काळ गाजवणारी अभिनेत्री म्हणजे शर्मिला टागोर. कश्मीर की कली या चित्रपटामुळे लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या या अभिनेत्रीचा आज वाढदिवस. त्यामुळे चाहत्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. यामध्येच त्यांच्या सुनबाईने म्हणजे करीना कपूरनेदेखील खास अंदाजात शर्मिला यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

करीना कपूर -खान इन्स्टाग्रामवर शर्मिला टागोर यांचा मोनोक्रोम थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये शर्मिला टागोर या ग्लॅमरस लूकमध्ये दिसून येत आहे. विशेष म्हणजे करीनाने हा फोटो शेअर केल्यानंतर त्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा चांगलाच पाऊस पडत आहे.

“माझ्या माहितीमधल्या सगळ्या स्ट्राँग आणि मनमिळावू स्त्रीयांपैकी एक असलेली स्त्री. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सासूबाई”, असं कॅप्शन करीनाने या फोटोला दिलं आहे. दरम्यान, करीनाप्रमाणेच सोहा अली खान आणि कुणाल खेमूनेदेखील शर्मिला टागोर यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 8, 2020 2:50 pm

Web Title: sharmila tagore birthday kareena kapoor wishes with throwback pictures ssj 93
Next Stories
1 ‘राहुल महाजनने केली आहेत चार लग्न’; गहना वशिष्ठचा दावा
2 ‘तूझी नेहमीच आठवण येईल’, दिव्या भटनागरच्या निधनावर अभिनेत्याने केली पोस्ट
3 ‘पटकन गाडीतून उतरलो आणि..’; ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील शंतनूची खास पोस्ट वाचाच
Just Now!
X