04 March 2021

News Flash

…म्हणून शर्मिला यांना वाटते तैमूरची चिंता

त्यांनी एका मुलाखतीमध्ये हे वक्तव्य केले आहे,

बॉलिवूड कलाकारांसोबतच स्टार किड्सची देखील चर्चा मोठ्या प्रमाणात होत असते. त्यात बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर खानचा लाडका लेक तैमूर अली खान तर नेहमीच चर्चेत असतो. यामुळे तैमूरची आजी आणि जेष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांना त्याची चिंता वाटते असं त्यानी एका मुलाखतीत सांगितले आहे.

सुभाष के झा यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये शर्मिला यांनी तैमूरची चिंता वाटते असे म्हटले आहे. “मला तैमूरची थोडी चिंता वाटते. आजपर्यंत या कुटुंबातील सगळ्यांनीच मीडियाचे लक्ष वेधून घेतले आहे. ते आपल्याला एका शिखरावर घेऊन जातात आणि नंतर ते खाली देखील आणतात. पण सध्या तैमूरवर याचा परिणाम होत नाही कारण तो खूप लहान आहे. त्याला आपल्या आजूबाजूला काय घडत आहे याची थोडीही कल्पना नाही. पण नंतर जेव्हा तो मोठा होईल आणि तेव्हा त्याला मिळालेले मीडिया अटेंशन जर काढून घेतले तर त्याच्यावर याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आम्हाला त्याची काळजी वाटते. पण साराच्या म्हणण्यानुसार आपण यावर काही करु शकतो का? खरे सांगायचे झाले तर मीडियाशिवाय आजच्या जगात आम्ही जिवंत नाही” असे शर्मिला यांनी मुलाखतीत म्हटले आहे.

पुढे त्या म्हणाल्या, “तो निरागस आणि लहान आहे. मी आशा करते की त्याच्यावर या सगळ्याचा परिणाम होणार नाही. मी मीडियाला विनंती करते की, तैमूरच्या बाबतीत थोडे संवेदनशील रहा.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 8, 2020 3:28 pm

Web Title: sharmila tagore is worried about grandson taimur ali khan dcp 98 avb 95
Next Stories
1 CID बंद का केलं? इन्स्पेक्टर दया म्हणाला….
2 KBC 12: खिशात कियारा अडवाणीचा फोटो घेऊन पोहोचला स्पर्धक, म्हणाला मला…
3 करीना कपूरने शेअर केला सासूबाईंचा ‘तो’ खास फोटो; म्हणाली…
Just Now!
X