shashank ketkar 02अनेक कलाकार आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी त्यांचे फोटो सोशल मिडियावर प्रसिद्ध करत असतात. महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेल्या एका लाडक्या कलाकाराने आपला बालपणीचा एक फोटो काही दिवसांपूर्वी ट्विटवर प्रसिद्ध केला होता.
दोन महिन्यापूर्वीच या कलाकाराच्या मालिकेने सर्वांचा निरोप घेतला. मात्र, आजही त्याची ओळख त्याच्या मालिकेतील नावानेच केली जाते. सध्या त्याचे ‘गोष्ट तशी गमतीची’ हे नाटक बरेच गाजत आहे. त्याचसाठी तो ऑस्ट्रेलियाला पोहचला आहे. ‘वन वे तिकीट’ या चित्रपटातून तुम्हाला लवकरच त्याला रुपेरी पडद्यावर पाहता येणार आहे. आता तरी ओळखलंत तुमच्या या लाडक्या कलाकाराला. नाही.. अहो, ‘होणार सून मी या घरची..’ या प्रसिद्ध  मालिकेतून घराघरांत पोहोचलेला, नुसता घरातच नाही तर कित्येकांच्या मनात जागा मिळवणारा ‘श्री’ म्हणजेच शशांक केतकर याचा हा बालपणीचा फोटो आहे. शशांकने काही दिवसांपूर्वीच हा फोटो ट्विटरवर शेअर केला होता. शशांकचे प्राण्यांवर असलेले प्रेम या फोटोतही दिसून येते.