शाहरूख म्हणजेच ‘बॉलिवूडचा किंग’ त्याचे चाहते जगभरात आहे. बॉलिवूडच्या या ‘रोमँटीक हिरो’नं प्रेमाची एक वेगळीच परिभाषा चाहत्यांना शिकवली. २०१३ साली शाहरूख ‘चेन्नई एक्स्प्रेस’च्या चित्रीकरणादरम्यान मुन्नारमधल्या एका हॉटेलमध्ये थांबला होता. ज्या खोलीत त्याचं वास्तव्य होतं त्या खोलीचं रुपांतर चाहत्यांनी जवळजवळ मंदिरातच केलं आहे. काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी मुन्नारमधल्या या हॉटेलचा फोटो शेअर केला आहे.
‘या हॉटेलमध्ये यत्र तत्र सर्वत्र शाहरुखच आहे. आराम करायलाही जागा नाही’ असं लिहिती शशी थरूर यांनी हॉटेलच्या खोलीमधले फोटो शेअर केले आहे. विशेष म्हणजे या खोलीत शाहरुखचं मोठं कटआऊटही लावण्यात आलं होतं. या कटआऊटसोबतही थरूर यांनी फोटो काढले आहेत. शाहरूखवरचं चाहत्यांचं हे प्रेम थरूर यांनी फोटोतून दाखवून दिलं आहे.
Dear @iamsrk, when on a brief visit to Munnar yesterday I took rest in the room you occupied in 2013, which has been converted into a shrine for you & #ChennaiExpress! Every wall is decorated w/posters of the film &the suite is dominated by this cut-out of you. No place for rest! pic.twitter.com/hFUYCgXLEc
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) January 21, 2019
मुन्नारमधली एका भेटीदरम्यान थरूरही याच खोलीत थांबले होते. यावेळी हॉटेलच्या भिंतीपासून जिथे जागा मिळेल तिथे शाहरूखचे ‘चेन्नई एक्स्प्रेस’मधले फोटो लावण्यात आले होते. शाहरूखवरच्या प्रेमापोटी ही खोली शाहरूखच्या फोटोंनी सजवण्यात आल्याचं थरूर यांनी दाखवून दिलं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 22, 2019 6:26 pm