27 February 2021

News Flash

स्टार प्रवाहवर नवी मालिका ‘शतदा प्रेम करावे’

प्रेम सर्व सीमांपलीकडे आहे. प्रेम सर्व  सीमांपेक्षा श्रेष्ठही आहे.

प्रेम सर्व सीमांपलीकडे आहे. प्रेम सर्व  सीमांपेक्षा श्रेष्ठही आहे. प्रेम हे अनंतकाळापर्यंत आहे. प्रेमाला कसलीच मर्यादा नाही. प्रेमाला वयाचीही मर्यादा नाही.  म्हणूनच कोणीतरी शतदा प्रेम करावे असं लिहून ठेवलंय. अशाच कथासूत्रावर आधारित असलेली स्टार प्रवाह वरची आगामी नवीन मालिका. २९ जानेवारीपासून सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता दाखल होत आहे. या मालिकेच्या निमित्ताने दिगदर्शक—निर्माता अभिजित साटम पहिल्यांदा छोटय़ा पडद्यावर दाखल होत आहे. जाहिरातींमधून आपण त्याला सतत पाहत होतो, परंतु त्याच्या चाहत्यांना त्याला आता दररोज पाहण्याची संधी मिळणार आहे.

मालिकेच्या कथानकाविषयी व भूमिकेविषयी माहिती देताना अभिजित सांगतो, जेव्हा प्रेम खरं असतं, तेव्हा वयाचं  महत्त्व एका आकडय़ापेक्षा जास्त नसतं. मालिकेची कथा तशी रंजक आहे. या मालिकेत माझी उन्मेष नावाची व्यक्तिरेखा आहे. जो यशस्वी उद्योजक आहे. उत्तम शिक्षण घेतलेल्या, लहान वयात यशस्वी झालेल्या उन्मेषचे पाय जमिनीवर स्थिर आहेत. मालिकेतील नायिका सायली ही १८—१९ वर्षांची अगदी फुलपाखरासारखी अल्लड बिनधास्त मुलगी आहे. जी अभिनेत्री स्नेहा शहा साकारत आहे. ती आपल्या वडिलांसोबत सोलापूरमध्ये  रहात असते. तिच्या वडिलांचं नाव यशवंत  असून त्यांची सोलापूरात सोलापूरी चादरींची  छोटी फॅक्टरी होती. जी आता बंद पडली असून त्यांना मुंबईत नोकरी मिळाली आहे. नोकरीच्या  ट्रेनिंगसाठी त्यांना परदेशात जाण्याची सुवर्णसंधी चालून आलेली आहे. आपल्या गैरहजेरीत यशवंत आपल्या अल्लड मुलीला  आपल्याहून बरेच वर्ष लहान असलेल्या  मित्राच्या म्हणजेच उन्मेषच्या  घरी मुंबईला राहायची संमती सायलीला देतात. उन्मेषही त्यांना होकार देतो. कारण उन्मेषवर यशवंतचे खूप उपकार आहेत.  यशवंतकडूनच मिळालेलं शिक्षण आणि  पॅशनच्या जोरावरच उन्मेष शिकून—सवरून आज मुंबईत मोठय़ा पदापर्यंत  पोहोचला आहे. उन्मेषला याची जाण आहे, अशी ही थोडक्यात कथा आहे. त्याचप्रमाणे सायली सोलापूरातून मुंबईत उन्मेषच्या मोठय़ा घरात येते. उन्मेष आपल्या आई आणि  भावंडांबरोबर मुंबईत राहत असतो. आपला बिझनेस सांभाळतानाच तो सायलीचे  प्रोजेक्ट्स करणं, तिला काय हव नको ते पाहणं, ती आजारी पडली तर रात्र रात्र  जागणं अस एखाद्या लहान मुलाप्रमाणेच तिची काळजी घेतो. उन्मेषची आपुलकी पाहून सायलीला बरं वाटतं. त्यामुळे तिच्याही मनात त्याच्याविषयी आपुलकी निर्माण होते.  या सगळ्यात ते दोघं एकमेकांकडे कशापद्धतीने पाहतात, ते एकमेकांच्या प्रेमात  पडतात का , त्यांच्यातल्या  या नात्याचं पुढे काय होतं?, अशा अनेक प्रश्नांचा  ‘शतदा प्रेम करावे’ या मालिकेत उलगडा होणार आहे, असे तो आवर्जून सांगतो. मालिकेत अभिजीत साटम,स्नेहा शहा, यांच्या जोडीला यशवंतच्या भूमिकेत विद्याधर जोशी दिसणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2018 1:53 am

Web Title: shatda prem karave star pravah new serial
Next Stories
1 नार्कोजचे गँगवॉर
2 नंदनवनातील मुर्दाड जग..
3 तब्बल ३५ वर्षांनंतर सौदीत आनंदी आनंद गडे
Just Now!
X