ओटीटी प्लॅटफॉर्मला मनोरंजनाचं एक उत्तम माध्यम म्हटलं जातं. गेल्या काही काळात नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम, हुलू, हॉटस्टार यांसारख्या अनेक प्लॅटफॉर्मवरुन एकापेक्षा एक वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस आल्या आहेत. परिणामी जगभरातील कलाकारांनी आता आपलं लक्ष चित्रपट आणि मालिकांसोबतच वेब सीरिजच्या दिशेने देखील वळवलं आहे. मात्र या वेब सीरिजवर अनेकदा अश्लिलता आणि हिंसेचा प्रचार केल्याची टीका देखील केली जाते. हे टीकाकार ओटीटी प्लॅटफॉर्म्स सेन्सॉरशीपची मागणी करत आहेत. मात्र त्यांच्या या मागणीला अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी विरोध केला आहे. असं झाल्यास सर्जनशिलता संपून जाईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

अवश्य पाहा – ‘व्यायाम करण्यासाठी जीमची गरज नाही’; अभिनेत्रीने साडीवरच मारले पुशअप्स

अवश्य पाहा – हॉटेलमधील वेटर ते प्रसिद्ध अभिनेत्री; पाहा राखी सावंतचा थक्क करणारा प्रवास

“वेब सीरिजच्या माध्यमातून धर्म आणि संस्कृती यांचा अपमान केला जातोय अशी टीका मी अनेकदा ऐकली आहे. परंतु हे साफ खोटं आहे. खरं तर या टीकेच्या माध्यमातून त्यांना सर्जनशील कलाकारांसमोर अडथळे निर्माण करायचे आहेत. सेन्सॉरशीप लादून त्यांना कलाकारांच्या विचारांना दाबायचं आहे. असं झाल्यास काही प्रतिगामी विचारांच्या लोकांमुळे भरभराटीला येणारा उद्योग उध्वस्त होईल. आपण यांना विरोध करायला हवा.” अशा आशयाचं ट्विट करुन शत्रूघ्न सिन्हा यांनी ओटीटी सेन्सॉरशीपवर भाष्य केलं. त्यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.