अभिनेते आणि नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी नुकतंच आपल्या ट्विटर हँडलवरुन एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी सरकारला टोला लगावला आहे. ते आजच्या दिवसात अजून बरेच ट्विट करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

आपल्या ट्विटमध्ये त्यांनी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये एक रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातला संवाद आहे. डॉक्टर रुग्णाला म्हणत आहे की, ऑक्सिजन नाहीये मन की बात लावू का? हा फोटो शेअर करत शत्रुघ्न म्हणतात, “हे गांभीर्याने घेण्यासाठी नाही मात्र दुर्दैवाने सध्या आपलं सरकार हेच करत आहे”.

शत्रुघ्न आपल्या पुढच्या ट्विटमध्ये काही विनोद शेअर करत म्हणतात, “आज जागतिक हास्य दिन आहे. अशा कठीण काळात आपल्या मनाला थोडी विश्रांती हवी असते. जेणेकरुन आपण दुसऱ्यांना मदत करण्यासाठी अधिक खंबीर होऊ शकू. म्हणूनच काही हलकेफुलके ट्विट्स आज शेअर करत आहे”.

देशात करोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. रुग्णसंख्या वेगाने वाढत असून मृतांची संख्याही वाढत आहे. आज सकाळी पूर्ण झालेल्या २४ तासांमध्ये देशात ८०हजार ९३४ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे करोनाबाधितांचा आकडा आता ३३लाख ४९ हजार ६४४वर पोहोचला आहे. तर ३ लाख ७हजार ८६५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. देशात काल दिवसभरात एकूण ३,६८९ मृतांची नोंद झाली.