News Flash

“मी क्रिकेटर आहे हे तिला माहितच नव्हतं”; हार्दिक पांड्याने सांगितली सरप्राइज साखरपुड्याची गोष्ट

हार्दिकने साखरपुडा करणार असल्याची कल्पना आई-वडिलांनाही दिली नव्हती.

हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅन्कोविच

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि त्याची गर्लफ्रेंड नताशा स्टॅन्कोविच यांचं प्रेमप्रकरण गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. नताशा आणि हार्दिक हे आई-बाबा होणार असल्याची गोड बातमी हार्दिकने सोशल मीडियावरून दिली होती. या दोघांनी घरच्या घरी गुपचूप लग्न उरकल्याचीही चर्चा आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हार्दिकने त्याच्या नताशासोबत पहिल्यांदा भेट कशी झाली आणि सरप्राइज साखरपुड्याची गोष्ट सांगितली.

‘क्रिकेटटाइम्स डॉटकॉम’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, “आमची पहिली भेट खूप विचित्र होती. म्हणजे मी खूप वेगळा आहे, असं तिला वाटलं होतं. त्यावेळी डोक्यावर टोपी, गळ्यात चेन आणि हातात घड्याळ असा माझा लूक होता. रात्री एक वाजता आमची पहिल्यांदा भेट झाली. हा कोणीतरी अत्यंत वेगळ्या स्वभावाचा माणूस दिसतोय, असं तिला वाटलं होतं. त्यावेळी पहिल्यांदा आम्ही एकमेकांशी बोलू लागलो होतो. त्यानंतर मैत्री झाली. हळूहळू बोलणं वाढलं आणि आम्ही डेट करू लागलो. ३१ डिसेंबर रोजी आम्ही साखरपुडा केला.”

विशेष म्हणजे नताशाला हार्दिकबद्दल काहीच माहित नव्हतं. तो क्रिकेटर आहे हेसुद्धा तिला ठाऊक नव्हतं. ३१ डिसेंबर रोजी साखरपुडा झाल्यानंतर १ जानेवारी रोजी दोघांनीही सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले. या साखरपुड्याबद्दल तो पुढे म्हणाला, “माझ्या आई-वडिलांना त्याबद्दल काहीच कल्पना नव्हती. साखरपुड्याच्या दोन दिवस आधी मी कृणालला सांगितलं होतं. मी ज्या व्यक्तीवर खूप प्रेम करतो, ती व्यक्ती मला भेटली आहे आणि तिच्यासोबत राहून मी चांगला व्यक्ती बनत चाललो आहे, असं त्याला सांगितलं होतं. सरप्राइज साखरपुड्यानंतर आईवडिलांनीही साथ दिली. तुला जे योग्य वाटतं ते कर असं ते म्हणाले.”

३१ मे रोजी हार्दिक पांड्याने नताशासोबतचा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत बाबा होणार असल्याची बातमी चाहत्यांना दिली. ‘मी आणि नताशा आमच्या सहजीवनाचा प्रवास आनंदाने करत आहोत आणि आता तो प्रवास अजूनच आनंददायी होणार आहे. नताशा गरोदर असून आता आम्हा दोघांत लवकरच तिसरा जीव येणार आहे. आम्ही या नव्या पाहुण्यासाठी खूप उत्सुक आहोत. याचसोबत तुम्हा साऱ्यांचे आशीर्वाद असेच पाठीशी राहोत,’ असं त्याने फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2020 11:53 am

Web Title: she had no idea who i was says hardik pandya on surprise engagement with natasa stankovic ssv 92
Next Stories
1 अशोक सराफ यांच्या नावामागची कहाणी; पाहा ‘तो’ खास फोटो
2 ‘वीरे दी वेडिंग’ चित्रपटाच्या कास्टिंग डायरेक्टरचं अवघ्या २८ व्या वर्षी निधन
3 सोनू सूदच्या मदतकार्यात पत्नीचाही मोलाचा वाटा
Just Now!
X