24 November 2020

News Flash

‘ती माझ्या मांडीवर बसली होती’; अभिनेत्याच्या कॉमेंटवर शेफाली संतापली, म्हणाली…

सलमान खानच्या प्रश्नावर अभिनेत्यानं दिलं वादग्रस्त उत्तर

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘बिग बॉस’ला मोठ्या धुमधडाक्यात सुरुवात झाली. हा शो सुरु होऊन आता तीन आठवडे उलटून गेले आहेत. दरम्यान ‘बिग बॉस’च्या घरात आता कविता कौशिक, शार्दुल पंडित आणि नैना सिंह या तीन नव्या स्पर्धकांची वाईल्ड कार्ड एण्ट्री झाली आहे. या एण्ट्रीनं आता एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. घरात येताच शार्दुलनं अशी एक कॉमेंट केली की ज्यामुळे ‘बिग बॉस’ची माजी स्पर्धक शेफाली जरीवाला देखील संतापली आहे.

सर्वाधिक वाचकपसंती – आली लहर केला कहर; अभिनेत्रीने वाढदिवशी केला ११ हजार फुटांवरुन स्टंट

अभिनेता शार्दुल पंडित हा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहे. घरात येताच शोचा होस्ट सलमान खाननं त्याला तू कविता आणि नैनाला ओळखतोस का? असा प्रश्न विचारला. या वर तो म्हणाला, “होय मी यापूर्वी कवितासोबत एका मालिकेत काम केलं आहे. व नैनाला तर मी माझ्या मांडीवर बसवलं आहे.” नैनाबाबत केलेल्या या कॉमेंटमुळे बिग बॉसची माजी स्पर्धक शेफाली जरीवाला संतापली आहे.

सर्वाधिक वाचकपसंती – सुनेच्या आरोपांवर महेश भट्ट यांचं प्रत्युत्तर; ठोकला १ कोटींचा मानहानिचा दावा

“शार्दूल कुठलंही वाक्य उच्चारताना एकदा विचार कर. तू अत्यंत वाईट आणि अश्लिल कॉमेंट केली आहेस.” अशा आशयाचं ट्विट करुन शेफालीने आपला संताप व्यक्त केला आहे. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. शेफालीसोबतच नैनाने देखील शार्दूलच्या कॉमेंटवर नाराजी व्यक्त केली. “तू म्हणतोयस त्याला मांडीवर बसणं नव्हे तर एकत्र कॉमेंट्री करणं म्हणतात.” अशा शब्दात तिने आपला संताप व्यक्त केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2020 12:18 pm

Web Title: shefali jariwala naina singh shardul pandit bigg boss 14
Next Stories
1 वैमानिक ते अभिनेता.. प्रणव पिंपळकरचा अभूतपूर्व प्रवास
2 स्पर्धकाला ८० हजार रुपयांच्या ‘या’ प्रश्नाचे देता आले नाही उत्तर, तुम्ही देऊ शकाल का?
3 नैना सिंहने सांगितलं बिग बॉस 14 मध्ये सहभागी होण्याचं कारण; म्हणाली…
Just Now!
X