News Flash

करोनापासून वाचण्यासाठी अभिनेत्री डोक्यात घातली चक्क प्लास्टिकची पिशवी, पाहा भन्नाट व्हिडीओ

सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला आहे. १४ एप्रिलपर्यंत म्हणजेच २१ दिवसांसाठी हा लॉकडाउन असणार आहे. त्यामुळे प्रत्येकजण करोना व्हायरसबाबत जनजागृती करण्याचे संदेश सोशल मीडियाद्वारे देत आहे. यात बॉलिवूड कलाकार पहिल्या क्रमांकावर आहेत. ते सतत सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत घरात बसा असे अनेक संदेश लोकांना देत आहेत. अशातच अभिनेत्री शेफाली शाहने देखील एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे.

शेफालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने संपूर्ण चेहरा प्लॉस्टिकच्या पिशवीने कव्हर केला आहे. तसेच ही प्लास्टिकची पिशवी डोक्यात घालून ती लोकांना करोनापासून स्वत:चे रक्षण कसे कराल याची माहिती देत आहे. तसेच हा व्हिडीओ शेअर करत तिने ‘घरी असे करण्याचा प्रयत्न करु नका’ असे देखील म्हटले आहे.

शेफालीच्या या व्हिडीओला अनेकांनी दाद दिली आहे. तर काहींनी तिचा हा प्रयत्न भयानक आहे असे म्हटले आहे. या व्हिडीओमध्ये तिने ‘क्वारंटाइनमध्ये असताना असेच काही से वाटते. पण करोनाने तुमच्या फुफुसांवर हल्ला केला तरही असच जाणवेल. आपल्याकडे कोणताही पर्याय उरलेला नाही. त्यामुळे घरातच थांबा आणि सुरक्षित रहा. किमान तुमच्या कुटुंबीयांच्या आणि मित्रपरिवाराच्या सुरक्षिततेसाठी’ असे तिने व्हिडीओमध्ये म्हटले आहे.

करोना व्हायरसमुळे देशभरात आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात करोना बाधितांची एकूण संख्या ६४९ आहे. त्यात ५९३ जण अजूनही करोना पॉझिटिव्ह आहेत. ४२ जण करोना मुक्त झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 26, 2020 12:32 pm

Web Title: shefali shah instagram video tightly covers face in plastic bag viral on social media avb 95
Next Stories
1 प्रकाश राज यांनी वयाने १२ वर्ष लहान कोरिओग्राफरशी केलंय लग्न
2 ‘घरचं सामान घेऊन जाणाऱ्यालाही मारणं योग्य आहे का?’; दिग्दर्शकाचा संतप्त सवाल
3 शेवंता झाली शेफ; पाहा घरी बसून काय करतेय?
Just Now!
X