News Flash

शेफाली शाहचे दिग्दर्शन असलेल्या ‘हॅप्पी बर्थडे मम्मीजी’चं पहिलं पोस्टर रिलीज

'समडे'नंतर शेफाली दिग्दर्शित हा दूसरा लघुपट आहे.

(Photo-PR)

अभिनेत्री शेफाली शहाने टेलिव्हिजनसह, चित्रपट, थिएटर आणि आता ओटीटी प्लेटफार्मवरून प्रेक्षकांचं कायम मनोरंजन केलंय. लवकरच शेफाली आपली ‘हॅप्पी बर्थडे मम्मीजी’ ही शॉर्ट फिल्म घेऊन येत आहे. या लघुपटाची कथा शेफालीची असून त्याचे दिग्दर्शनदेखील तिनेच केले आहे. नुकतच सनशाइन पिक्चर्स सोबत या चित्रपटाचे पाहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.

शेफालीने आपल्या सोशल मीडियावर देखील या शॉर्ट फिल्मचं पोस्टर शेअर करत आनंद व्य़क्त केलाय. तसचं या सिनेमासाठी चाहत्यांकडून तिने आशिर्वाद मागितले आहेत. “मी एका नवीन दिशेकडे झेप घेतली आहे. त्यामुळे तुमची साथ असू द्या.” असं शेफाली म्हणाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shefali Shah (@shefalishahofficial)

हे देखील वाचा: फरहान अख्तरच्या ‘तूफान’ सिनेमावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा रिव्ह्यू , सिनेमा पाहून म्हणाला…

लघुपटाबाबत बोलताना शेफाली म्हणाली की, “ही आपल्या मधल्या सर्वांचीची गोष्ट आहे, जे आपले नाते, कुटुंब, घरामुळे ओळखले जात असतात… हॅप्पी बर्थडे मम्मीजी”चे कथानक एका महिलेचा भावनात्मक प्रवास आहे, ज्याच्यासोबत प्रत्येक महिला स्वतःला जोडून घेऊ शकते.” असं शेफाली म्हणाली.

शेफाली ‘हॅप्पी बर्थडे मम्मीजी’च्या निमित्ताने, एक अशी कथा पडद्यावर आणणार आहे ज्यामध्ये समान परिस्थितीतून जाणाऱ्या हजारों महिलांची कहाणी सामील आहे. शेफालीद्वारे दिग्दर्शित या लघुपटाचे चित्रीकरण मुंबईत करण्यात आले आहे. ‘समडे’नंतर शेफाली दिग्दर्शित हा दूसरा लघुपट आहे. लवकरच शेफाली आलिया भट्ट आणि विजय वर्मासोबत ‘डार्लिंगस्’ मध्ये दिसणार आहे. ‘हॅप्पी बर्थडे मम्मीजी’चे हे पोस्टर शेफाली दिग्दर्शकाच्या खुर्चीतून आपल्याला काय खास देणार आहे याबद्दल उत्सुकता वाढवणारे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2021 4:41 pm

Web Title: shefali shaha directed happy birthday mummyji film first poster release kpw 89
Next Stories
1 फरहान अख्तरच्या ‘तूफान’ सिनेमावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा रिव्ह्यू , सिनेमा पाहून म्हणाला…
2 “पडलीस ना गटारात”; ‘तारक मेहता…’मधील बबीताच्या फोटोंवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट
3 सावळ्या रंगामुळे ‘या’ अभिनेत्रीला मिळत नव्हते चित्रपट; बॉलिवूडमध्ये बराच संघर्ष करावा लागला
Just Now!
X