News Flash

‘ही’ अभिनेत्री एका इन्स्टाग्राम पोस्टसाठी घेते इतके पैसे; कमाई जाणून व्हाल थक्क!

'बिग बॉस १३'मुळे अभिनेत्री आली होती चर्चेत

शहनाज गिल

‘बिग बॉस १३’ फेम शहनाज गिल हा शो संपल्यानंतरही सोशल मीडियावर चर्चेत असते. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर तिचा एक म्युझिक अल्बमसुद्धा प्रदर्शित झाला. या रिअॅलिटी शोमुळे तिच्या फॅन फॉलोइंगमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. याच वाढत्या फॉलोअर्समुळे शहनाजला सोशल मीडियावर एक पोस्ट टाकण्यासाठी रग्गड पैसा मिळतोय.

इन्स्टाग्राम या फोटो शेअरिंग अॅपवर शहनाजचे ४९ लाख फॉलोअर्स आहेत. तिच्या प्रत्येक पोस्टला सात ते आठ लाख लाइक्स असतात तर व्हिडीओला १० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळतात. त्यामुळे शहनाज विविध ब्रँड्सकडून जाहिरातीसाठी चांगलं मानधन घेते.

‘स्पॉटबॉय ई’ या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार शहनाज एका पोस्टसाठी सर्वसाधारणपणे पाच लाख रुपये मानधन घेते. मात्र सध्या तिने ही रक्कम वाढवून आता आठ लाख रुपये इतकी केली आहे. मोठमोठे सेलिब्रिटी एका पोस्टसाठी १० लाख रुपयांपर्यंत मानधन घेतात. इतर टीव्ही अभिनेत्रींच्या तुलनेत शहनाज घेत असलेलं मानधन खूपच जास्त आहे. इन्स्टाग्राम पोस्टमधून कमाई करण्यात ‘बिग बॉस १३’चा स्पर्धक असिम रियाजसुद्धा अग्रेसर आहे.

आणखी वाचा : शून्य ते १८ लाख, पॉर्न इंडस्ट्रीकडे वळलेल्या या सुपरकार रेसरची सहा दिवसांतील कमाई

Hopper HQ ने दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री प्रियांका चोप्रा व क्रिकेटर विराट कोहली हे इन्स्टाग्राम पोस्टसाठी सर्वाधिक मानधन घेतात. प्रियांका एका पोस्टसाठी सुमारे १ कोटी ८६ लाख ९५ हजार रुपये घेते तर विराट कोहली एका पोस्टसाठी सुमारे १ कोटी ३५ लाख २१ हजार रुपये घेतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2020 3:51 pm

Web Title: shehnaaz gill charges this much amount for one post ssv 92
Next Stories
1 ‘बालाजी प्रोडक्शन’ आर्थिक संकटात?; बॅक स्टेज कर्मचाऱ्यांनी दिला आंदोलनाचा इशारा
2 गांधी-गोडसे एकाच फोटोमध्ये; राम गोपाल वर्मांविरोधात संताप
3 टायगर श्रॉफने दिशाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; व्हिडीओ पोस्ट करुन म्हणाला…
Just Now!
X