News Flash

Video : मुलीवरचा राग निवळला; शहनाज गिलच्या वडिलांची माघार

“तिच्याशी पुन्हा कधीच बोलणार नाही”; शहनाजच्या वडिलांनी केला होता निर्धार

शहनाज गिल व तिचे वडील

“मी तिच्याशी पुन्हा कधीच बोलणार नाही”, असा निर्धार करणारे गायिका व अभिनेत्री शहनाज गिलचे वडील यांनी एक नवीन व्हिडीओ युट्यूबवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओत संतोष सिंग सुख यांनी मुलीवरचा राग निवळल्याचं स्पष्ट केलं आहे. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत त्यांनी शहनाजवर नाराज असल्याची भावना व्यक्त केली होती. “शहनाज चंदिगडमध्ये असूनसुद्धा घरी आली नाही. एका म्युझिक व्हिडीओसाठी शहनाज चंदिगडला गेली होती. तिथून तिचं घर अवघ्या दोन तासांच्या अंतरावर होतं. मात्र तिने कुटुंबीयांना भेटण्याचं टाळलं,” अशी तक्रार त्यांनी केली होती.

आता नवीन पोस्ट केलेल्या व्हिडीओत ते म्हणाले, “ती माझी मुलगी आहे आणि मला तिच्यावर खूप प्रेम आहे. मी तिच्यावर थोड्या वेळासाठी नाराज होऊ शकतो पण आयुष्यभर नाही.”

आणखी वाचा : प्रभूदेवा दुसऱ्यांदा बांधणार लग्नगाठ?

काय आहे प्रकरण?

‘टेलिचक्कर’ला दिलेल्या मुलाखतीत ‘बिग बॉस’ फेम शहनाज गिलचे वडील म्हणाले, “शहनाज चंदिगडमध्ये शूटिंगसाठी आली आणि तिथून दोन तासांच्या अंतरावर असलेल्या तिच्या कुटुंबीयांना ती भेटू शकली नाही. ती चंदिगडमध्ये आली होती, हेसुद्धा मला वृत्तवाहिन्यांमधून समजलं. तिच्या आजोबांचं नुकतंच गुडघ्यांचं ऑपरेशन झालंय. किमान त्यांना तरी एकदा भेटण्याची तसदी तिने घेतली नाही.”

“मी शपथ घेतलीये की आता मी तिच्याशी पुन्हा कधीच बोलणार नाही. माझ्याकडे तिच्या मॅनेजरचाही फोन नंबर नाही. माझे काही खूप जवळचे मित्र आहेत. त्यांच्या मुलांना शहनाजसोबत फोटो काढायचा होता. तिच्याकडे याबद्दलची विनंती केली तेव्हासुद्धा माझ्याकडे वेळ नाही असं कारण देत तिने साफ नकार दिला. तिच्याकडे आमच्यासाठी अजिबात वेळ नाही”, असं ते पुढे म्हणाले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2020 11:37 am

Web Title: shehnaaz gill father retracts statement that he would never speak with her again ssv 92
Next Stories
1 Video : लग्नासाठी सलमानने जुही चावलाच्या वडिलांकडे मागितला होता हात, पण..
2 ओटीटी माध्यमांवर अंकुश ठेवण्याच्या निर्णयाबद्दल नाराजी
3 “मी तारणहार नाही”; सोनू सूदच्या पुस्तकाचं कव्हर पेज व्हायरल…
Just Now!
X