News Flash

शहनाज गिलच्या वडिलांनी बलात्काराचा आरोप फेटाळला

त्यांनी एका मुलाखतीमध्ये वक्तव्य केले आहे.

बिग बॉस-१३ मधील स्पर्धक शहनाज गिलचे वडील संतोख सिंह सुख यांच्यावर एका महिलेनं बलात्काराचा आरोप केला होता. या विरोधात तिने पोलिसात तक्रार दिली होती. त्यावरून गुन्हा दाखल झाला आहे. संतोख यांनी बंदूकीचा धाक दाखवून अत्याचार केल्याचा आरोप महिलेनं केला आहे. हा आरोप शहनाजच्या वडिलांनी फेटाळला आहे.

या संदर्भात नुकताच संतोख यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्या दिवशी ते संपूर्ण दिवस घरात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्याच बरोबर संतोख यांनी त्यांच्या संपूर्ण घरात सीसीटीव्ही असल्याने ते घरातच असल्याचा पुरवा त्यांच्याकडे आहे, असा दावा त्यांनी केला आहे.

‘मी त्या दिवशी पूर्ण दिवस घरीच होतो. माझ्या संपूर्ण घरामध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत आणि त्यामुळे माझ्याकडे पुरावा आहे. माझ्यावर आरोप केलेली महिला घस्फोटीत आहे आणि तिला एक मुलगा आहे. ती माझा व्यवसायातील भागीदार लकी संधू याच्याशी लग्न करु इच्छित होती. मी लकीला गेल्या कित्येक दिवसांपासून ओळखतो आहे,’ असे त्यांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2020 9:53 pm

Web Title: shehnaaz gill father santokh singh clarification on rape case filed against him avb 95
Next Stories
1 धक्कादायक! अभिनेता आणि त्याच्या गर्लफ्रेंडचा संशयास्पद मृत्यू
2 रिंकूचा साडीतला व्हिडीओ पाहून चाहत्याने घातली थेट लग्नाची मागणी
3 जॉर्डनमध्ये अडकलेला अभिनेता अखेर दोन महिन्यांनी परतला मायदेशी
Just Now!
X